कुंकवाचा साज, असाच कायम राहू द्या, ______ रावांना डोळे भरून, ७ जन्म पाहू द्या

प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौणिमेची, ________ रावांचे नाव घेते, सून देशमुखांची

पतीच्या दीर्घयुष्यासाठी, निष्ठेचे बंधन, ______ रावांचे नाव घेऊन करते, सर्वांना वंदन

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा, __________ रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा

आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा, ________ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा

झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास, _______ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास

मराठी सण म्हणजे, आनंदाचा क्षण, _______ रावांचे नाव घेते, सुखी राहुदेत सर्वजण

पावसाच्या येण्याने, पक्षांचे चालले आहे कूजन, ________ रावांचे नाव घेते, आणि वडाचे करते पूजन

देवच बनवतो, ७ जन्माची गाठ, _______ रावांच्या दीर्घआयुष्यासाठी, वडाला फेरे मारते सात

आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊदेत तुमच्या ईच्छा, ______ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा