यमुनेच्या डोहात, कृष्ण वाजवितो पावा, ________ रावांचा नि माझा, संसार सुखाचा व्हावा.

दाग नको दागिना नको, नको चंद्रहार, _______ रावांचे नाव, हाच माझा अलंकार.

परिसाच्या संगतीने झाले लोखंडाचे सोने, _________ रावांच्या कृपेने लाभले, सौभाग्याचे लेणे.

विठ्ठलाचे पायी, वीट झाली भाग्यवंत, ________ रावांच्या छायेत झाले, मीहि भाग्यवंत.

राम-लक्ष्मण-सीता, तिघे निघाले वनी, ______ रावांचे नाव पडो, सर्वांच्या कानी.

Arrow

जय जवान जय किसान, गर्जतो सारा देश, ______ रावांच्या जीवाकरिता, घातला सौभाग्याचा वेश.

गंगा यमुना सरस्वती, साऱ्या झाल्या तृप्त, _______ रावांच्या पदरी घालून, आईबाप झाले मुक्त.

प्रसन्न झालेले घरकुल साधे, इथे शांती नांदे, ________ राव मला पती लाभले, भाग्य थोर माझे.

Arrow

उत्तम कुळी जन्मले, उच्च कुळी आले, ________ रावांचे नाव घेऊन, भाग्यशाली झाले.