मॅरेज सर्टिफिकेट साठी सर्वप्रथम मुलगा आणि मुलगी या दोघांच्या लग्नपत्रिका पाहिजेत.
त्यानंतर खाली दिलेल्या वेबसाईटवर
जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल
https://portal.mcgm.gov.in/
डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड आणि जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर वरील एकही डॉक्युमेंट लागणार नाही.
सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील तर मुलगा आणि मुलगी दोघांना 3-3 विटनेस लागतील.
आंतरजातीय विवाह असेल तर तुम्हाला मुलीचा, भटजींचा एफिडेविट बनवावा लागेल. तुम्हाला कोणत्याही एका धर्मा मध्ये समाविष्ट व्हावे लागेल.
स्वतःचे ३ फोटो लागतील आणि सोबत असणारे विटनेस यांचेदेखील तीन फोटो लागतील
विवाह करण्यासाठी कमीत कमी 18 वय पूर्ण असावे . 18 वय पूर्ण नसल्यास हा कायद्याने हा गुन्हा आहे
ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला वेळ आणि तारीख मेल किंवा मोबाईल वरती मेसेज करून पाठवली जाते त्यानुसार तुम्हाला तिकडे जावे लागते.