मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड,
____________ राव माझे नुसते पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.
लग्नानंतर मकर संक्रात हा, पहिला सण मी करते साजरा, _________________ रावांचा स्वभाव, आहे फार लाजरा.
गुळाणी येते, तिळाला गोडी,
____________
रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी.
मकर संक्रांत म्हणून, पतंगाने आकाशात घेतली भरारी, मी घेतली _________ रावांसोबत, आयुष्यभराची सवारी.
दुसऱ्याची पतंग कापायला, पाहिजे धारधार मांजा, _________ रावांचे नाव घेते, गाव माझे लांजा.
आकाशात दिसतोय, पंतंगाचा वेगवेगळा रंग, ___________ राव हवेत मला, ७ जन्मासाठी संग.
लाडू बनवण्यासाठी, गुळात मिसळले तिळ, ___________ रावांना देऊन बसले मी, पहिल्या भेटीतच दिल.
नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या, पूर्ण होवोत ईच्छा, ____________ रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.