सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण, अन सुखांची बरसात.. दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात.. गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी.. नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात.. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा.. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान.. आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा! हॅप्पी गुढी पाड़वा..!

दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!