Ukhane Marathi Kelvan | केळवण उखाणे
Ukhane Marathi Kelvan हे खास नवीन वधू-वरांसाठी लिहिले गेले आहेत. लग्नाच्या आधी मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक हे केळवण ठेवतात. यामध्ये वधू वराला जेवणासाठी बोलवतात आणि साडी किंवा काही भेटवस्तू देतात. या कार्यक्रमात पाहुणचार केला जातो. लग्नाच्या आधीपासून आपले दिवस चांगले व्हावे यासाठी हि परंपरा जोपासतात. महाराष्ट्रात केळवण ठेवण्याची पद्धत ही फार जुनी आहे त्यामुळे हि परंपरा आपण कायम ठेवूया. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा.
1- मित्र मैत्रींनकडून आले आहे मला, केळवणाचे आमंत्रण,
______________ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना देते मी लग्नाचे निमंत्रण.2- केळवणाचे जेवण असते, केळाच्या पानावर,
उखाणे नको आता, सध्या लक्ष आहे खानावर.3- माझ्या केळवणासाठी, तुम्ही खास केले डेकोरेशन,
_____________ रावांचे नाव घेते, आणि तुम्हाला देते लग्नाचे इन्व्हिटेशन.4- लग्नाच्या आधी केळवण, ठेवण्याची आहे प्रथा,
____________ रावांची आणि माझी, तुम्हाला ऐकवेन प्रेम कथा.5- केळवणामध्ये स्पेशल आहे, चिवडा आणि लाडू,
_______________ रावांचे नाव घेते, पोट भरले माझे अजून जेवण नका वाडू.6- केळवणामध्ये आहेत, खूप प्रकारची फळे,
________ रावांचे नाव घेते, मी आज आनंदी आहे तुमच्या सर्वांमुळे.
7- केळवणामध्ये भेटले मला, खूप सारे गिफ्ट,
____________ रावांनी दिली मला, आयुष्यभराची लिफ्ट.8- मेजवानीची रंगत, केळवणाची पंगत,
_____________ रावांचे नाव घेते, तुमच्यासारख्या मित्रांची असुदे आयुष्यभर संगत.9- केळवण म्हणजे, एक प्रेमाचा गोड घास,
_____________ रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास.10- गोड घास साथीला, पंचपक्वानाने भरलेले चांदीचे ताट,
________________ रावांचे नाव घेते, आजचे केळवण म्हणजे कौतुकाचा थाट.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.