Ukhane For Newly Married Bride
Ukhane For Newly Married Bride हे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील या वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. नवीन लग्न झालेल्या महिलांना उखाणे घ्यावे लागतात हि अतिशय उत्तम वेबसाईट आहे उखाण्यांसाठी. हि भारतातील नंबर वन वेबसाइट आहे.
Ukhane For Newly Married Bride हे तुम्ही सर्वांसोबत शेअर करू शकता. उखाणे घेणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्यात खूप आनंद आहे. उखाणे म्हणजे दोन जीवांचे प्रेमळ क्षण.
Marathi Ukhane For Newly Married Couple
1- सुखदुःखाच्या धाग्यांनी, जीवन वस्त्र विणले,
_________ रावांच्या सहवासाचे, भाग्य मला लाभले.
2- सासरच्या कौतुकात राहिले नाही, काळाचे भान,
_________ रावांचे नाव घेते, सर्वांचा राखून मान.
3- पित्याने दिली विद्या, मातेने दिले गृहशिक्षण,
___________ राव मिळाले, हेच माझे भूषण.
4- नाव घ्या नाव घ्या, आग्रह कशासाठी,
__________ रावांचे नाव होते ओठावर, पण थांबले होते उखाण्यासाठी.
5- कुटुंबाच्या आरोग्याची, काळजी घेणार नवीन सून,
________ रावांचे नाव घेते, घरात येते माप ओलांडून.
6- आयुष्यात काही गमवल, तर काही मिळवल,
खर प्रेम काय असत, हे _________ तूच मला शिकवल.
7- मे महिना म्हणजे, आंब्याचा सिझन,
_______ रावांचे नाव घेण्यासाठी, मला भेटले आहे रिझन.
8- लग्नामध्ये काय भारी, मारली होती एन्ट्री,
_________ आता मला घेऊन जावा फिरायला, फॉरेन कंट्री.
9- जीवनाची ही घडी, अशीच राहू दे,
_________ रावांना आता आयुष्यभर, सोबत पाहू दे.
10- चांदण्यांचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रीला,
________ रावांचे नाव घेते, चंद्र आहे साक्षीला.
11- गंध नाव धुंद करी, हवेत हा गारवा,
__________ रावांचे नाव घेते, आज पहिला आमचा पाडवा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.