Traditional Ukhane in Marathi For Female
Traditional Ukhane तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धत म्हणजे लग्नात उखाणे घेणे. उखाणे घेणे पती पत्नीसाठी फार आनंदाचा आणि अविस्मरणिय क्षण असतो.
Traditional Ukhane जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही नक्की शेअर करा. उखाणे घेणे नवरा नवरीसाठी फार महत्वाचे असते. अशाच प्रकारचे उखाणे जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की या वेबसाईटला भेट द्या.
मराठी पारंपारिक उखाणे
1- यमुनेच्या डोहात, कृष्ण वाजवितो पावा,
________ रावांचा नि माझा, संसार सुखाचा व्हावा.
2- दाग नको दागिना नको, नको चंद्रहार,
_______ रावांचे नाव, हाच माझा अलंकार.
3- परिसाच्या संगतीने झाले लोखंडाचे सोने,
_________ रावांच्या कृपेने लाभले, सौभाग्याचे लेणे.
4-विठ्ठलाचे पायी, वीट झाली भाग्यवंत,
________ रावांच्या छायेत झाले, मीहि भाग्यवंत.
5- राम-लक्ष्मण-सीता, तिघे निघाले वनी,
______ रावांचे नाव पडो, सर्वांच्या कानी.
6- जय जवान जय किसान, गर्जतो सारा देश,
______ रावांच्या जीवाकरिता, घातला सौभाग्याचा वेश.
7- गंगा यमुना सरस्वती, साऱ्या झाल्या तृप्त,
_______ रावांच्या पदरी घालून, आईबाप झाले मुक्त.
8- प्रसन्न झालेले घरकुल साधे, इथे शांती नांदे,
________ राव मला पती लाभले, भाग्य थोर माझे.
9- उत्तम कुळी जन्मले, उच्च कुळी आले,
________ रावांचे नाव घेऊन, भाग्यशाली झाले.
10- नेसला नवा शालू, त्यावर सोन्याचा साज,
_______ रावांचे नाव घेते, हक्काने आज.
11- वाद्यांमध्ये सुरेल वाद्य, म्हणजे बिन,
______ रावांच्या चरणी ______ बाई लीन.
12- असावे नेहमी हसतमुख, बोलावे नेहमी गोड,
_______ रावांच्या संसाराला, _____चि लाभली जोड.
13- नाव घ्या नाव घ्या, सगळे झाले गोळा,
________ रावांच्या येण्याने, रंगून आला आजचा सोहळा.
14- प्रेम मिळत नाही बाजारात, प्रेम मिळत नाही दुकानात,
________ रावांसाठी भरपूर प्रेम आहे, माझ्या हृदयात.
15- घराच्या अंगणात बांधला, प्रेमाचा झुला,
________ रावांचे नाव घेते, आशीर्वाद द्या मला.
16- लग्नानंतर हाक मारायला लागते आहो,
________ रावांचे नाव नेहमी, माझ्या हृदयात राहो.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.