101 Shivaji Maharaj Ukhane | शिवाजी महाराज उखाणे.
Chhatrapati Shivaji Maharaj Ukhane हे आपल्या भारतीय बंधू आणि भगिनींसाठी खास बनवले गेले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. शिवाजी महाराजांचे उखाणे खास आपल्या मावळ्यांसाठी आहेत.
येथे शिवाजी महाराज यांच्या पराक्रम आणि देशासाठी केलेलं महान कार्य यांना अनुसरून हे उखाणे बनवले गेले आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे. मराठा साम्राज्य हे शिवाजी महाराजांनी बनवले आहे. Shiavji Maharaj Ukhane जर तुम्हाला आवडले असतील नक्की तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहचवा.
Shivaji Maharaj Ukhane For Male and Female.
Shivaji Maharaj Ukahne For Male and Female हे अगदी सोपे आहेत. शिवाजी महाराज उखाणे हे खास आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे स्त्री- पुरुष सर्वजण वापरू शकता.
1- महाराष्ट्रातील खिंड जी, हिंदू भूमीचे द्वार,
_________ रावांचे नाव घेते आम्ही, शिवरायांचे घरदार.
2- चंद्रभागेच्या तिरी बसलाय, माझा विठोबा सावळा,
______ च नाव घेतो मी, छत्रपती शिवरायांचा मर्द मराठा मावळा.
3- छत्रपती शिवाजी महाराजांनी, तयार केले मजबूत राष्ट्र,
_____आणि______ कडून, सर्वांना जय महाराष्ट्र.
4- जाती-भेद नाही केला, कधी आमच्या शिवरायाने,
_____च नाव घेऊन पाऊल टाकते घरात, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने.
5- शिवनेरी किल्यावर झाला, शिवाजी महाराजांचा जन्म,
__________ रावांसारखे पती मिळावे, ७ जन्म.
6- छत्रपती शिवाजी महाराज आहेत, स्वराज्याचा हिरा,
_______ रावांचे नाव घेऊन , उखाणा करते पुरा.
7- मराठा आमची जात, भगवे आमचे रक्त,
_______ च नाव घेतो, मी शिवरायांचा भक्त.
8- भगवा झेंडा आहे, आमची शान,
_______च नाव घेतो, ठेवून सर्वांचा मान.
9- शिवाजी महाराजांनी केली, औरंगजेबाची मात,
________ रावांचे नाव घेऊन, पाऊल टाकते आत.
10- शिवाजी महाराज आहेत, अखंड भारताची शान,
________ रावांचे नाव घेते, ताठ ठेवून मान.
11- दरी-दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा,
____आणि____ च्या लग्नात आहे _____ चा बँडबाजा.
12- शिवाजी महाराजांच्या राज्यात, सुखी होती प्रजा,
_______रावांच्या जीवावर, करेन मी मजा.
13- धन्य ती जिजाऊ आणि शहाजी राजे, ज्यांनी जन्म दिला शिवबाला,
_____आले आयुष्यात म्हणून, महत्व भेटले जीवनाला.
14- तलवार आणि ढाल आहे, शिवबांचे शस्त्र,
________राव आहेत माझे पती, आणि जिवलग मित्र.
15- ताठ होतील माना, उंच होतील नजरा,
_____आणि _____कडून शिवरायांना मानाचा मुजरा.
16- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला, पुस्तके पडतील कमी,
________ला आयुष्यभर खुश ठेवण्याची, देतो मी हमी.
17- जाती-भेद कधी नव्हता, रयतेच्या राज्यात,
_______ला पत्नी बनवून आणली, आमच्या समाजात.
18- कपाळी लावतो आम्ही, भगवा गंध,
_____आणि ______ला आहे शिवबांचा छंद.
19- छत्रपती शिवाजी महाराज, आमचे आदर्श आहेत,
_______ राव माझे सौभाग्य आहेत.
20- प्रत्येक मावळ्यांनी दिली, शिवबांना साथ,
______आणि______ ला सर्वांच्या आशीर्वादाने घ्या घरात.
21- शिवरायांचे मावळे आम्ही, नाही कुणाची भीती,
_____ आहे माझी, सौभाग्याची प्रीती.
22- भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्यांची आग आहे,
_____रावांचे नाव घेते______ घराण्याची शान आहे.
23- शब्द पडतील कमी, येवढी महाराजांची कीर्ती आहे,
______ रावांसोबत पतीच्या आधी, एक प्रेमळ मैत्री आहे.
24- छत्रपती शिवाजी महाराजांचा, इतिहास वाचताना अंगावर काटा येतो,
_______ ला नेहमी सुखी ठेवण्याचे वचन, मी सर्वांसमोर देतो.
25- छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराष्ट्राच्या पाठीचा कणा,
_____ च नाव घेतो सर्वानी, जय महाराष्ट्र म्हणा.
26- छत्रपती शिवाजी महाराज आले कि, शत्रू जायचे पळून,
___________ चे नाव घेतो, जरा बघा मागे वळून.
27- शिवरायांसारखे कार्य, कुणाला नाही जमायचे,
________ माझे प्रेम, तुला नाही कळायचे.
28- शिवबांचे मावळे आम्ही, जन्म आमचा मराठ्यांच्या जातीचा,
_________ च नाव घेतो, अभिमान आम्हाला या मातीचा.
29- पराक्रम बघून, तोंडात बोट घालणारे अनेक असतात,
_______ आम्ही शिवरायांचे मावळे, मनात सर्वांच्या घर करतात.
30- छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, अमर आहे जगात,
_________ रावांचे नाव घेते______ च्या घरात.
31- धन्य ती माउली, ज्या बनल्या शिवबांच्या गुरु,
_____ रावांचे नाव घेऊन, उखाणा करते सुरु.
32- जिथे शिवभक्त उभे राहतात, तिथे शांत बसतात सर्व,
______ रावांसारखे पती मिळाले, म्हणून आहे मला गर्व.
33- सह्याद्रीच्या छातडातून, नाद भवानी गाजे,
_______रावांचे नाव घेते, छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे.
34- सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये, आजही शिवाजी महाराजांच नाव घुमतंय,
_____ आणि ______ ला आशीर्वाद द्यायला, आज सर्व मित्र परिवार जमतंय.
35- छत्रपती शिवाजी राजे मिळाले, महाराष्ट्राच्या मातीला,
______ रावांसारखे प्रेमळ पती, मिळाले आयुष्यभर साथीला.
36- शिवाजी महाराजांची होती, सिंहाची चाल आणि गरुडाची नजर,
________ रावांचे नाव घेण्यास, नेहमी मी हजर.
37- रयतेचे राजे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज एकच,
__________ राव समाजासाठी, नेहमी कार्य करतात नेकच.
38- जरी कापल्या आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची,
__________ रावांची अशीच साथ असुदे, सात जन्माची.
39- जरी फाडली आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची,
पत्नी म्ह्णून मी नेहमी, सुखा-दुःखात साथ देईन _____ रायांची.
40- शिवाजी महाराजांची कीर्ती, आणि त्यांचा इतिहास वाचून बघ,
_______ छाती मानाने फुगते, फक्त एकदा जय शिवराय बोलून बघ.
41- मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली उडी,
___________ रावांच्या नावाने, गळ्यात बांधते मंगळसूत्राची जोडी.
42- छत्रपती शिवाजी महाराज, नेहमी गादीवर बसावे,
______ रावांचे नाव घेते, तुमचे आशीर्वाद सदैव असावे.
43- शिवरायांनी राज्य केले, शक्ती पेक्षा युक्तीने,
_______ रावांचे नाव घेते, प्रेमभाव भक्तीने.
44- शिवरायांच्या माथेवर, भवानी मातेचा हात,
________ रावांची अशीच असुदे, जन्मभर साथ.
45- मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात, सह्याद्रीच्या रांगा,
________ रावांचे नाव घ्यायला, मला केव्हाही सांगा.
46- रायगडाच्या सिहांसनावर, छत्रपती शिवाजी राजे,
________ रावांनी येताच, आयुष्य बदलेले माझे.
47- सह्याद्रीच्या गडावर पडते, छत्रपती शिवाजी महाराजांची सावली,
___________ रावांचे नाव घेते, धन्य ती माउली.
48- मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही,
_____ च नाव घेतो, आयुष्यात कधी तुझी साथ सोडणार नाही.
49- हिंदवी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी,
______ आपण संसाराची सुरवात, करूया सर्वांच्या आशीर्वादांनी.
आणखी उखाणे वाचा-> Fauji Ukhane in Marathi | फौजी उखाणे <—-क्लीक करा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.