Rukhwat Ukhane in Marathi | रुखवत उखाणे.
Rukhwat Ukhane हे महाराष्ट्रामध्ये लग्नात घेतले जातात. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी खूप चविष्ट पदार्थ बनवलेले असतात ते सोबत पाठवतात. पहिल्या काळात मुलगी तिची कला आपल्या सासरवाडीला दाखवण्यासाठी रुखवत बनवत असे.
Rukhwat Ukhane घेणे हि तर महाराष्ट्राची परंपराच आहे. एखादा बाकडा पूर्ण पदार्थाने सजवलेला असतो. तुम्हाला हे उखाणे आवडल्यास तुम्ही नक्की शेयर करा.
1- उन्हाचे चांदणे, उंबऱ्यात सांडले,
__________ रावांसाठी आई बाबांनी, रुखवत मांडले.
2- फळ कापायला, द्या सूरी,
मी तर आहे, गोड गोड पुरी.
3- आमच्या शेतात, पेरला घेवडा,
आत आहे, खुसखुशीत चिवडा.
4- जावई बापू, नका लाजू,
आत आहे, गोड काजू.
5- अनुभवाची फुले, गोळा करते खाली वाकून,
चिरोटे म्हणतात, बघता का चाखून??
6- दोन्ही परिवारांनी मिळून, लग्न केले फिक्स,
सर्वांनी चाखून बघा, कुरकुरीत चिप्स.
7- साडीत साडी, पेशवाई,
मी तर आहे, बालुशाई.
8- नव्या वधूच्या पावलांनी, घरात पडले ठसे,
मी आहे आत, अनारसे.
9- ननंदबाई देवपूजेसाठी, लागतो गडू,
मी आहे मनमोहक, बुंदीचा लाडू.
10- फुलफळांनी भरलेली बाग, सर्वांना आवडे,
_________ रावांना ठेवेल, रुखवतासाठी लाडवे.
11- लग्नात भारी होता, तुमच्या बॅण्ड बाजा,
मी तर आहे, खुसखुशीत खाजा.12- झिमा फुगडीचे, खेळ सखे खेळू,
लग्नात बुंदीचे, लाडू आता वळू.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.