Connect with us

150+ Romantic Ukhane in Marathi for Male| रोमँटिक मराठी उखाणे.

romantic ukhane

Romantic Ukhane for Male हे खास पुरुषांसाठी बनवले गेले आहेत. हे समजण्यास आणि आपल्या पत्नीसाठी घेण्यास खूप सोपे आहे. उखाणे घेण्यासाठी लग्न कार्यात मोठी मज्जा असते. Romantic Ukhane For Male तुम्ही सहज डाउनलोड करू शकता.

WhatsApp Group Join Now

जेव्हा नवीन पती आपल्या पत्नीसाठी उखाणे घेतो त्यावेळी तो खूप लाजतो. उखाणे हे फार पूर्वी पासून चालत आलेले आहेत. Romantic Ukhane हे उखाणे सध्या खूप लोकप्रिय होत चालले आहेत. हे उखाणे ऐकून तुमची पत्नी तुमच्या प्रेमात अजून वेडी होईल.

1- ISRO ने नवीन शोध लावण्यास, उडवला चंद्रयान,
मी लग्नसाठी खूप मुली पाहिल्या, परंतु Jeevansathi वर भेटली मला माझी _______ जान.

2- जिथून सुरवात केली होती, आज त्याच मंदिरात तिच्या सोबत आलो,
______________ च नाव घेतो, आज तिचा पती परमेश्वर झालो.

3- संसार म्हणजे, दोन घरांना जोडणारा पूल,
_______ च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

4- आठवणींच्या गावात, मी नेहमी रमून जातो,
जेव्हा ____________ च्या हाताचे, मटण वडे खातो.

5- रस्ता अडवण्यास, जमल्या साऱ्या बहिणी,
______ ला येउद्या घरात, आवडली ना तुमची वहिनी.

6- मराठा आमची जात, आम्ही ९६ कुळे,
स्वप्नाहून जग सुंदर दिसले, _______ तुझ्यामुळे.

7- कधी न दिला, डोळ्याला डोळा,
________ चा स्वभाव, अगदी साधा भोळा.

8- बहरली फुलांनी, निशिगंधाची पाती,
________ चे नाव घेतो, लग्नाच्या राती.

9- आई वडील, भाऊ बहिणी, जणू गोकुळासारखे घर,

______ च्या आगमनाने, पडली त्या सुखात भर.

10- आयुष्याच्या वळणावर, अडचणी आल्या खूप,
अखेर मन प्रसन्न झाले, _______ चे बघून रूप.

11- प्रसन्न वदनाने, आले रविराज,
________ ने चढविला संसाराला, स्नेहाचा साज.

12- तुझ्या सौंदर्याची चढली नशा मला, माझं मन तुझ्या मागे पळतंय,
_______ माझे डोळे दिवस-रात्र, तुझीच वाट बघतंय.

13- कुणीतरी माझे होईल, हात घेऊन हाती,
_________ मिठीत घेऊन मोजू चांदण्या, काळोखाच्या राती.

14- फोटो लावण्यासाठी, बनवली चवकोणी फ्रेम,
माझ्या लाडक्या _________ वर, माझे खरे प्रेम.

15- हळदीने लागला, अंगाला पिवळसर रंग,
__________ माझी नेहमी, घरकामात दंग.

Sad Status Marathi Download <—क्लिक करा

16- लग्नात लोकांना बसायला, कमी पडल्या खुर्च्या,
_____ आणि_______ ची होउदे गावात चर्चा.

17- घड्याळात आहेत, आकडे बारा,
_____ ला फिरवेन मी, जग सारा.

18- सुंदर जुन्या आठवणी, ताज्या करायच्या आहेत,
______ तुझ्यासोबत राहून, एक एक स्वप्न पूर्ण करायची आहेत.

19- शोभून दिसतो मुलींना, मराठमोळा साज,
आणि ______ चे सौदर्य करते, माझ्या मनावर राज.

20- नाते असावे अतूट, आणि घट्ट,
_______ चे पुरवेन मी, सर्व हट्ट.

Best Marathi Ukhane for Male

21- समुद्राचे पाणी, लागते खूप खारे,
_____ तुझ्यासाठी तोडून आणेन मी, चंद्र आणि तारे.

22- पूर्वे कडून आला वारा, पश्चिमेकडून आला पाऊस,
________ ला लग्नाच्या आधीपासून, साडी नेसण्याची खूप होती हाऊस.

23- आयुष्यात काही गोष्टी, भेटत नाही सहज,
______मी फक्त तुझा नवरा नाही, तर मला मित्रपण समज.

24- तू माझी शोना, मी तुझा बाबू,
_______ झाली कायमची, माझ्या संसारात काबू.

25- लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,
________ च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.

26- माझ्या डोळ्यात बघून, ती ओळखते सारे,
_____ सोबत आहे, माझे नाते न्यारे.

27- वेडा झालो तुझ्या प्रेमात, यात माझा काय गुन्हा,
_____सारखी बायको भेटूदे मला, ७ जन्मी पुन्हा.

28- विज्ञान युगात माणूस करतोय, निसर्गावर मात,
________ चा अर्धांगिनी म्हणून घेतला, मी माझ्या हातात हात.

29- काश्मीरच्या नंदवनात, फुलतो निशिगंध,
________ सोबत जीवनात, मला आहे आनंद.

30- काय सुंदर सजली होतीस, गुडीपाडव्याच्या सणात,
______ पहिल्या नजरेतच बसलीस, माझ्या मनात.

31- सर्वऋतूत, ऋतू आहे वसंत,
________ ला केली मी, पत्नी म्हणून पसंत.

32- सोन्याची सूंपली, मोत्यांनी गुंफली,
_______ राणी माझ्या, घरकामात गुंतली.

33- एसटी ला म्हणतात, लोक लाल परी,
______ आहे माझ्यासाठी, सोन परी.

34- कळी हसेल फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
_______ च्या सोबतीत गवसेल, जीवनाचा आनंद.

35- रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे,
___________ ला पाहून चंद्र, सूर्य हसे.

36- आपल्या मनातल बोलायला, धाडस लागत,
त्यासाठी _______ सारख्या मुलीच्या प्रेमात, पडाव लागत.

37- कपाळावर कुंकू, दिसेल उठून,
सगळे विचारतात, _____येवडी सुंदर बायको भेटली कुटून.

38- सुट्टी असते मला शनिवार आणि रविवार,
______ ला घातला मी मंगळसूत्र आणि लक्ष्मी हार.

39- श्रीकृष्णाने केला पण, रुक्मिणीलाच वरीन,
__________ च्या सोबत, आदर्श संसार करिन.

40- चला हवा येऊ द्या शो सोडतो, सर्वांना हसवून,
______ ला नेहीन हनीमुनला, विमानामध्ये बसवून.

41- गुगल वर, काहीही शोधले कि सापडते,
_____ तुझे बोलणे, नेहमी मला आवडते.

42- सूर्य चंद्राला पाहून, भरती ओटी येते सागराला,
_________ ची जोड मिळाली, माझ्या जीवनाला.

43- देव आमचा विठोबा, विटेवरी उभा,
_________ ने वाढवली, आमच्या घराची शोभा.

44- नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज,
__________ चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.

Romantic Ukhane in Marathi for Female.

Romantic Ukhane for Female हे खास नवीन वधूसाठी आहेत. वधू आणि वर रोमँटिक उखाणे देखील घेतात लग्नामध्ये. उखाणे भरपूर प्रकारचे आहेत त्यापैकी romantic ukhane हा एक त्याचा प्रकार आहे. हे उखाणे घेण्यासाठी अगदी सोपे आहेत.

हे उखाणे आपण आपल्या मित्रपरिवारांसोबत सहज शेयर करू शकता. उखाणे म्हंटले कि सर्वाना ऐकण्यासाठी फार उत्सुकता असते. नवीन नवरा नवरी जेव्हा घरी प्रवेश करतात त्यावेळी त्यांच्या उखाण्याच्या वेळी फार मज्जा येते. Romantic Ukhane for female अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय होत आहेत

1- आई बाबांचे नाव, सदा असावे ओठी,
त्यांच्याच आशीर्वादाने, __________ रावांसोबत जुळून आल्या रेशीमगाठी.

2- तुमच्या निरागस बोलण्याला, कसलीच तोड नाही,
आणि आता फक्त ______ तुमच्याशिवाय, मला कसलीच ओढ नाही.

3- समाज खूप काही बोला तरी, आम्ही सोडली नाही एकमेकांची साथ,
_______ रावांचे नाव घेते, अशेच असुदे आमच्यावर तुमच्या सर्वांचे आशीर्वादाचे हाथ.

4-लव वाली फिलिंग, हळू हळू वाढली,
________ राव तुमच्या रूपावर, आज मी भाळली.

5- स्वतःसाठी न जगता, जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात,
__________ राव त्यालाच, खर प्रेम म्हणतात.

6- कवीची कविता, कवीनेच वाचावी,
________ रावांची प्रेमाची फुले, ओंजळीने वेचावी.

7- सोशल मीडिया वर आजकाल, काहीही होतय Viral,
__________ रावांच्या घरात, आनंदाने करते मी Arrival.

8- महादेवाचे वाहन नंदी, गणपती बाप्पाचे वाहन उंदीर,
___________ रावांच्या संसारात बांधेल, प्रेमाचे मंदिर.

9- लालबागचा गणपती पाहायला, लागतात लांब रांगा,
_____ रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा.

10-अडचणीच्या वेळी, कामात पडते साठवण,
__________ राव इथे नसले की, येते त्यांची आठवण.

11- सात जन्माची, साथ देईन तुला,
______ बायको बनवून, तुझ्या घरी न्हे मला.

12- देवळात पसरला, अगरबत्तीचा सुगंध,
______ रावांच्या येण्याने, भेटला मला आनंद.

13- दोन जीवन एक असावे,
______ तुम्ही नेहमी, असेच हसत रहावे.

14- मेहंदी रंगून आली हातावर,
_____ रावांचे नाव, नेहमी माझ्या होटावर.

15- माझ्या हातावर तुमच्या नावाचे, अक्षर दिसेल शोभून,
______ तुमचे नाव काढले आहे, आता काढा शोधून.

16- दाराला लावले, झेंडूच्या फुलाचे तोरण,
______ रावांचे नाव, माझ्या हृदयात कोरण.

17- बोलताना जिभेचा, जाऊ देऊ नये तोल,
______ रावांच्या प्रेमाइतके, नाही कशाचे मोल.

18- कळत नाही माझेच मला, स्वप्न आहे कि भास,
________ रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास.

19- संसाराच्या अंगणात, ऊन पावसाचा खेळ,
____ रावांच्या अन माझ्या संसारी, इंद्रधनुष्याच्या मेळ.

20- शीतल आहे चांदणे, वारा आहे मंद,
_______ रावांना गाण्याचा, भारीच छंद.

21- मुंबई राजधानी आहे, महाराष्ट्राची,
_____ राव आहेत तर, कमी नाही कशाची.

22- गाण्याच्या मैफिलीत, पेटीचा सूर,
______ रावांची भेट म्हणजे, प्रेमाचा पूर.

23- दररोज आमच्या अंगणात, रांगोळी सजते,
______ रावांच्या डोळ्यात, नेहमी माझे प्रतिबिंब दिसते.

24- घाटातून जाताना सुटला, सुसाट वारा,
________ राव छेडती, माझ्या हृदयाच्या तारा.

25- गाई बैलांना लागतो, खायला चारा,
_______ रावांच्या आयुष्यात, कधी येऊ देणार नाही दुःखाचा वारा.

26- दरवळतोय घरात, अत्तराचा सुगंध,
_____ रावांचा सहवास, करतोय मला धुंद,

27- अमावसेच्या रात्री, चांदोबाचं लपण,
_____ राव हेच माझं, गुलाबी स्वप्न.

28- लग्न करून आनंदाने, संसार करते सुरु,
______ रावांची इच्छा आहे, संपूर्ण जग फिरू.

29- लांबसडक वेणीवर, शोभे गुलाबाचे फुल,
______ रावांना पाहताच, पडलीय मला भूल.

30- बघण्याच्या कार्यक्रमात, पोहे खाताना आले खूप हसू,
_____ रावांची इच्छा होती, माझ्या कडेला येऊन बसू.

31- अग्नीच्या साक्षीने, झाले आमचे लग्न,
______ रावांच्या विचारात, नेहमी मी मग्न.

32- आवडेल मला, नवीन नाती बांधायला,
________ रावांसोबत आली मी, सासरी नांदायला.

33- कधीच नाही ठेवावी, कोणत्याहि गोष्टीची आस,
________ रावांसाठी ठेवेन, मी सर्व उपवास.

34- नाव घ्या नाव घ्या, सर्वांचा आला आहे गजर,
_________ राव लांब राहा मुलींपासून, नायतर लागेल तुम्हाला नजर.

35- आमच्या लग्नात, पडत होता पाऊस,
______आणि ______ ची जोडी, जसे मिकी माउस.

36- भांडण आहे एक, प्रेमाचा भाग,
__________ तुमचं नाव घेते, सोडा आता राग.

37- खाण्यामध्ये आहे मी, प्यूअर व्हेज,
तरीपण ______तुमच्यासाठी स्वयंपाक करेन, मी नॉनव्हेज.

38- साखरपुडा झाला, आणि गालाला लागली हळद,
_______ रावांचे नाव, मेहंदीने हातावर रंगले गडद.

39- घरी बघायला आले तेव्हा, सर्वांसमोर लाजून हसली,
_____ रावांच्या प्रेमात, मी नकळत फसली.

40- कुठे कधी हरवले, कसे कोण जाणे,
_______ रावांच्या स्वप्नात, नेहमी मी म्हणत असे गाणे.

41- मी अशीच हासते, उगीच लाजते,
_________ मी तुझ्यासाठीच, नेहमी सजते.

42- सूर्य देवाला कोणी म्हणतात रत्नाकर, कुणी म्हणतात भास्कर,
__________ राव आहेत माझे, जन्मोजन्मीचे प्रियकर.

43- जीवनात एकत्र राहण्यासाठी, दिला हातात हात,
________ रावांना देईल मी, आयुष्यभर साथ.

44- प्रेमाचे संदेश पाठ्वण्यासाठी, मी कधीतरी लिहायचे पत्र,
_______ रावांनी अखेर, माझ्या गळ्यात घातले मंगळसूत्र.

45- सोंदर्य न बघता, मन बघून त्यांनी मला निवडले,
_________ रावांचे हे रूप, फार मला आवडले.

46- मोगऱ्याच्या फुलांना आलाय, सुंदर असा बहार,
आणि ______ रावांसोबत सुखी राहूदे, नेहमी आमचा संसार.

47- लग्नाच्या पत्रिकेवर, चित्र काढले गणपती बाप्पाचे,
आणि हातावर मेहंदीने, नाव लिहले ______ रावांचे.

48- प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात, आज अचानक धडधड,
________ राव माझे प्रेम आहे समजताच, कुटुंबात सुरु झाली बडबड.

49- काळजी घेत जा स्वतःची, शरीर जरी तुझे,
________ रावांचे नाव घेते, त्यात जीव आहे माझे.

50- मझ नको अश्रू, घाम हवा,
__________ रावांच्या सोबतीने, घेतला घर नवा.

PUBG Ukhane | पबजी उखाणे <–क्लीक करा.

Smart Marathi Ukhane For Male | वरासाठी स्मार्ट उखाणे.

Smart Marathi Ukhane for Male हे खास पुरुषांसाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे नवीन आहेत. उखाणे हे वर असो अथवा वधू दोघांना घेणे आवश्यक आहे. जर उखाणे घेतले नाही तर लग्नाला जमलेलं सर्व नातेवाईक वधू आणि वराला घरात प्रवेश करू देत नाही.

हे अगदी नव्या काळाचा विचार करून बनवले गेले आहेत. हे उखाणे तुम्ही कुठेही शेयर करू शकता. Smart Marathi Ukhane for Male हे इंटरनेट वर फार कमी भेटतील. स्मार्ट उखाणे हे खास वरासाठी बनवले आहेत.

1- जनतेच्या हक्कासाठी, मी सरकारशी लढेन,
_______ ला सुखी ठेवण्यासाठी, मी काहीही करेन.

2- हिरव्या झाडांमुळे, हवा लागते गार ,
______ च्या गळ्यात घालतो, मंगळसुत्रचा हार.

3- कमी नाही कसली आपल्याला, आणि नाही पैशाचा माज,
तुमच्याकरिता _____ च्या नावाने उखाणा घेतो आज.

4- नव्या नवरीचे, घरात पडतील ठसे,
_______ ला पाहून, सर्वजण हसे.

5- इंद्र्धनुष्यात आहेत, सप्त रंग,
________ आहे संसारात सुखी, माझ्या संग.

6- काळी माती, हिरवेगार रान,
______ आणि ची जोडी, आहे खूप छान.

7- घरातील धान्य भरण्यासाठी, प्रत्येक महिन्याला जाते D-मार्ट,
_______ पैसे वाचवण्यात, आहे खूप स्मार्ट.

8- सर्व प्रथम, आई वडिलांना हृदयात स्थान,
________ ने दिला मला, पतिराजांचा मान.

9- संपूर्ण आयुष्य घालवावे, गमतीने,
_______ सोबत संसार करेन, संगतीने.

10- होळीच्या सणाला लावतात, तोंडाला रंग,
_______ असते नेहमी, आपल्या कामात दंग.

11- महाराष्ट्रात असावा, मराठी भाषेचा मान,
_______ चे नाव घेतो, ऐका सर्व देऊन कान.

12- तुझ्या पावलांचे पडतील, घरात ठसे,
_______ तुला बघून, मी नेहमी हसे.

13- खडी साखरेचा खडा, खावा तेव्हडा गोड,
_________ च्या रूपात नाही, कुठेच खोड.

14- महिला दिवसभर, घरात करतात काम,
________ असते नेहमी, तिच्या मनावर ठाम.

15- नवग्रह मंडळात, शनीचे आहे वर्चस्व,
_________ आहे माझे, जीवन सर्वस्व.

16- मालवणी जत्रेत, झाली पहिली भेट,
_____ ला बायको बनवून, आणली घरी थेट.

17- केकात केक, चॉकलेट चा केक,
______ च नाव घेतो, लाखात एक.

18- पहिल्या भेटीत बनवलेल्या, चहाची आवडली टेस्ट,
______ आहे माझी, स्वयंपाकात खूप बेस्ट.

19- लग्नामध्ये आले पाहुणे, त्यांना बांधले फेटे,
________ च नाव घेतो, अशेच सर्वजण प्रत्येक कार्यक्रमात भेटे.

20- ना गाडी बंगल्याची अपेक्षा, फक्त आहे मान सन्मानाची इच्छा,
माझ्या अन ________ च्या संसाराला असाव्यात, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा.

21- हो नाही म्हणता, जुळले आमचे मन,
_____ सोबत साजरा करतोय, आज दिवाळीचा सण.

Lagnache Ukhane Marathi Male and Female | लग्नाचे उखाणे.

Lagnache Ukhane Marathi Male and Female हे महिला आणि पुरुष दोघांसाठी बनवले गेले आहेत. उखाणे हे लग्नात घेण्याची परंपरा आहे. उखाणे घेतल्याशिवाय लग्न अपुरे वाटते. उखाणे साठी हि वेबसाइट खूप छान आहे. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील.

नवीन नवरा नवरी Lagnache Ukhane Marathi Male and Female च्या खूप शोधात असतात. येथे तुम्ही हे उखाणे कॉपी करून आपल्या परिवारासोबत शेयर करू शकता. लग्नकार्यत उखाणे घेणे खूप मजेशीर असते.

1- अरिजित सिंग रोमँटिक सिंगर आहे, नाही त्याला तोड,
______ राव प्रोफेशनल सिंगर नाही, पण गातात खूप गोड.

2- शाळेचा अभ्यास करायला, मुलांना लागते वही,
माझ्या मंगळसूत्रावर ________ रावांची सही.

3- शास्त्रज्ञाने शोध लावला, आणि पोहचले चंद्रावर,
____________ रावांचे नाव कोरले, मी हृदयावर.

4- जुन्या गाण्यांची, वेगळीच होती धून,
______ रावांचे नाव घेते _____ ची सून.

5- गुलाबाच्या झाडांना, काट्यांचा कहर,
________ रावांनी फिरवले, मला संपूर्ण पुणे शहर.

6- शरीरासाठी चांगले असते, कोवळे ऊन,
_________ रावांचे नाव घेते,_______ ची सून.

7- नेत्रांच्या निरंजनात, प्रीतीची वात,
________ रावांच्या नावाने, संसाराला करते सुरवात.

8- गाण्याच्या भेंड्या खेळताना, लावला सर्वानी सूर,
__________ रावांच्या प्राप्तीसाठी, माहेर केले दूर.

9- कमळात उभी लक्ष्मी, मोरावर सरस्वती,
_______ रावांचे नाव घेते, मी खरी भाग्यवती.

10- नीलवर्णी आकाशात, मधुर पक्षांचा टाहो
________ रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य राहो.

Ukhane in Marathi For Male | मराठी उखाणे नवरदेवासाठी.

Ukhane in Marathi For Male हे खास नवरदेवसाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे अतिशय सोपे आणि मजेदार आहेत. हे उखाणे घेतले तर तुमची पत्नी नक्की तुमच्यावर फिदा होईल. उखाणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे.

हे उखाणे तुम्ही आपल्या मित्रपरिवारासोबत शेयर करू शकता. नवरदेवसाठी उखाणे इंटरनेट वर फार कमी मिळतील. या वेबसाइट वर सर्व प्रकारचे उखाणे तुम्हाला पहायला मिळतील.

1- काय तिची चाल, नुसती तुरु तुरु,
_____ सोबत आहे, माझी सेटिंग सुरु.

2- कुटुंबाला आनंदी ठेवण्याची, असावी स्त्रीकडे कला,
_______ सारखी बायको मिळाली, म्हणून आनंद झाला मला.

3- चुलीवरचे जेवण, लागते खूप भारी,
_______ ची मी, इच्छा पुरवेल सारी.

4- सूर चांगला असेल तर, गाण्याला येते गोडी,
_______ च नाव घेतो, सर्वाना आवडली का आमची जोडी.

5-आरशातील प्रतिबिंब, लाल टिकलीने लाजले,
___________ चे रूप, माझ्या मनात साजले.

Latest Marathi Ukhane For Male | नवरदेवाचे उखाणे.

Latest Marathi Ukhane for Male हे खास वरासाठी आहेत. उखाणे घेण्याची मज्जा फार असते. उखाणे शिवाय लग्न हे अपूर्ण असते. उखाणे नवरा आणि नवरी दोघांना घ्यावेच लागतात त्याशिवाय पाहुणे मंडळी घरी प्रवेश करू देत नाही.

Marathi Ukhane for Male च्या शोधात भरपूर असतात. हे उखाणे लग्नात घेण्यासाठी खूप सोपे आहेत. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील. हे उखाणे तुम्ही डाउनलोड आणि शेयर करू शकता.

1- गोऱ्या गोऱ्या गालावर , आहे एक तीळ काळा,
______ च्या गोड स्माईलचा, लागलाय मला लळा.

2- चित्रकाराने केली फलकावर, रंगांची उधळण,
_____ चे नाव भासे, जणू माणिक मोत्यांची उधळण.

3- साईंचे आम्ही भक्त, नेहमी म्हणतो ओम साई,
__________ च नाव घेतो, करू नका घाई.

4- तिला पाऊस आवडतो, आणि मला थंडी,
______ हनिमूनला जायची, भेटूदे आपल्याला संधी.

5- एका मुलीमध्ये पाहिजे, ते सर्व आहेत माझ्यामध्ये गुण,
______ रावांचे नाव घेते_________ ची सून.

6- नाते टिकवून ठेवण्यासाठी, चांगली असावी दृष्टी,
_______ राव आले आयुष्यात, म्हणून चांगली वाटते सृष्टी.

7- तबला वाजे, पेटी वाजे, छान वाजे वीणा,
_______ रावांचे नाव घेते, सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा.

8- विद्येचं माहेर घर, आहे म्हणतात पुण,
________ रावांच्या जीवनात, मला नाही उण.

9- पेट्रोलचा भाव झाला, आहे शंभर,
________ आहे माझी, एकच नंबर.

Navardevache Ukhane Marathi | नवरदेवाचे  उखाणे.

Navardevache Ukhane हे खास नवीन लग्न होणाऱ्या वरासाठी आहेत. हे उखाणे घ्यायला आणि समजायला खूप सोपे आहेत. पाहुण्यांना आणि तुमच्या पत्नीला खूप आवडतील हे उखाणे. उखाणे घेणे लग्नात एक आनंदाची गोष्ट असते.

नवीन लग्न होताना मुले Navardevache Ukhane च्या शोधात असतात. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. हे उखाणे तुम्ही डाउनलोड आणि शेयर करू शकता.

1- भारताची परंपरा आहे, मुलीने नेसावी साडी…
______ तुझ्यासाठी आणली मी, फॉरचुनर(Fortuner) गाडी.

2- लग्नात एंट्री मारली मी, घोड्यावर बसून,
________ च नाव घेतो, तिचे डोळे पुसून.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close