सूर्य देवामुळे, आपल्या पृथ्वीवर पडतो प्रकाश, __________ आज माहेर सोडून आली, म्हणून भरून आले आकाश.
तुझ्या डोळ्यात नेहमी असतात आसू, तरीपण तू दिसतेस खूप ढासू, _______________ बनवशिल का, माझ्या आईला तुझी सासू.
देवच बनवतो, सात जन्माच्या गाठी, _________ रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी.
घरात ठेवली आहे, आज वास्तू , _________ रावांचे नाव घेते देवा, सर्वांना कर तथास्तु
घरी बघण्यासाठी आली होती, जाधवांची स्वारी, __________ रावांसोबत करेन आता, पंढरीची वारी.
रुमझुम रुमझुम, पैंजण वाजती, _______ रावांचे नाव घेण्यास, मी कशाला लाजती.
सुखांच्या फुलांचा, कसा गंध सांगू, _________ रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागू.
आई-बाबांची आपण लग्न करून, पूर्ण केली इच्छा, ___________ तुला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा.
कोवळ्या वयात, प्रेमाचा रंग येतो बरसून, _________ साठी मी बसलो होतो, खूप तरसुन.
सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले, _________ रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.
पैठणी घालण्यासाठी, मी फार आहे हौशी, ________ रावांचे नाव घेते, होम मिनिस्टरच्या दिवशी.
यमुनेच्या डोहात, कृष्ण वाजवितो पावा, ________ रावांचा नि माझा, संसार सुखाचा व्हावा.