Navri Ukhane Marathi
Navri Ukhane Marathi हे खास महिलांसाठी लिहिले गेले आहेत. या वेबसाईटमध्ये आम्ही नवीन उखाणे लिहिण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. उखाणे घेणे महिलांना फार आवडते आणि नवीन नवरीसाठी हे खास लिहिले आहेत. या वेबसाईटमध्ये तुम्हाला खूप उखाणे मिळतील. हे उखाणे तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेयर करा.
Navri Ukhane Marathi हे महिलांना नक्कीच आवडतील अशी आशा आम्ही बाळगतो. या वेबसाईटच्या माध्यमाने आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक काण्याकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी तुम्ही हे उखाणे सर्वांसोबत शेयर करा.
1- अवचित नयन उघडता, नवल घडले,
_____________ रावांना आले स्थळ फार, पण माझ्यावरच अडले.
2- नात्यातले आपलेपण, तेव्हाच कळले ,
जेव्हा ___________ रावांसोबत माझे, नाते जुळले.3- यांच्या भरोश्यावर, मी सोडले माझे घर,
आणि ___________ रावांमुळेच, माझ्या आयुष्यात आली भर.4- हे नसते तर मी, नसते घडले,
_______________ रावांना बघताच, मी त्यांच्या प्रेमात पडले.5- येथे सर्व जमलेल्या नातेवाईकांचे, आपल्या डोक्यावर आहेत हात,
_________________ राव आता फक्त हवी मला, तुमची आयुष्यभराची साथ.Navri Ukhane Marathi for Husband
6- नजरेच्या भाषेला, शब्दाची नाही गरज,
_____________ रावांना पाहताच, मी होकार दिला सहज.7- बघण्याच्या कार्यक्रमात, पहिली भेट झाली आमची ग्रेट,
_____________ रावांना मी होकार दिला मी, त्या दिवशीच थेट.8- खोल समुद्राच्या शिंपल्यात, सापडतात मोती,
_____________ राव आहेत माझे, ७ जन्माचे सोबती.9- प्रेम म्हणावे कि आकर्षण, मनात होती व्यथा,
______________ रावांसोबत झाली माझ्या, आयुष्याची प्रेमकथा.Navri Ukhane Marathi for Girl
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.