30+ Marathi Ukhane on Food | खाण्यावरून मराठी उखाणे.
Marathi Ukhane on Food खूप मजेशीर उखाणे असतात . लग्नकार्यात जेव्हा नवरा नवरी जेवायला बसतात शेवटी तेव्हा हे उखाणे घेतले जातात. उखाणे म्हणजे उत्साहाचा क्षण असतो नवरा नवरीसाठी. उखाणे खूप छान आणि मजेशीर असतात.
नवरा नवरी एक दुसऱ्यांसाठी हे उखाणे घेतात. Marathi Ukhane on food यामध्ये कोणतीही खायची वस्तू घेऊन उखाणे बनवले गेले आहेत जे आपण सहज वापरू शकतो. हे अगदी वाचायला सोपे आहेत. तुम्ही हे उखाणे डाउनलोड आणि शेयर करू शकता.
1- लग्नामध्ये होती, बासुंदीची गोड मेजवानी,
अन ______ च्या साथीने लिहिली, प्रेमाची कहाणी.
2- आजचा दिवस आहे, दोन्ही परिवारासाठी खास,
_______ ला भरवतो मी, पुरी भाजी चा घास.
3- लग्नात जमली आहेत, माणसे खूप खास,
_____ ला भरवतो मी, गुलाबजामूनचा घास.
4- मँगो जूस बनवण्यासाठी, आंब्याची काढते साल,
_____रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल.
5- खायला आवडतो मला, मुंबईचा वडापाव,
________मला बायको बनवून, न्हे तुझ्या गाव.
6- आनंदाने पार पडला, दिवस आजचा लग्नाचा,
__________रावांना घास देते, गोड जिलेबीचा.
7- लग्नात गोड मेनू, ठेवला होता बासुंदी,
________ आले माझ्या आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.
8- उन्हात त्वचा काळी होऊ नये, म्ह्णून लावते सनस्क्रीन,
______ साठी ठेवला लग्नात, वॅनिलाचा आईसक्रीम.
9- भाजीमध्ये कार्ले, आहे खूप कडू,
______ अग खाली वाक, सर्वांचे पाय पडू.
10- कोल्हापूरचा फेमस आहे, तांबडा पांढरा रस्सा,
______ नेहमी म्हणते मला, मांडीवर घेऊन बस्सा.
11- मुलींची आवडती डिश आहे, पाणीपुरी,
पण _______ माझ्यासोबत खाते, फक्त शेवपुरी.
12- फालुदामध्ये टाकतो, आईसक्रीम वाला सब्जा,
__________ रावांनी केला, माझ्या मनावर कब्जा.
13- गाजरला इंग्लिशमध्ये, म्हणतात कॅरेट,
_______ रावांसोबत झाले, माझे लव्ह मॅरेज.
14- घरात झाडे लावायला, लागतात कुंडी,
________ रावांनी ठेवली, लग्नात बुंदी.
15- सासू बाई चांगल्या बनवतात, बैंगन भरता,
______ रावांचे नाव घेते, सर्वांच्या करिता.
16- सासरी आहेत माझ्या, सासू, सासरे आणि दीर,
_______ रावांना खायला आवडते, शेवयांची खीर.
17- खाण्यामध्ये चायनीज खाण्याची, खूप आहे हाऊस.
_________ रावांचे नाव घेते, पडला आज पाऊस.
18- जंक फूड खाऊन खाऊन, पोटाची लागली वाट,
______ आजपासून बनवेल माझ्यासाठी, पंच पक्वानाचे ताट.
19- स्वीट मध्ये आहे, फेव्हरेट गुलाब जामून,
_______ बाहेर गेली कि, खाते खूप दाबून.
20- उखाणे ऐकण्यासाठी, बसली सर्व मंडळी खास,
_______ रावांचे नाव घेऊन, भरवते श्रीखंडचा घास.
21- पाणीपुरी मध्ये असते, आंबट,गोड पाणी,
_____ राव आहेत राजा, आणि मी त्यांची राणी.
22- पंचपक्वानाने घरात, सुटलाय छान सुगंध,
________ रावांच्या जीवनात येऊन, मला भेटलाय आनंद.
23- लागली आहे मला भूक, प्लिज पुरी वाढा अजून एक,
___________ रावांचे नाव घेते, लाडाची मी लेक.
24- आजकालच्या जीवनात, खातात सगळे फास्ट फूड,
_________ रावांचा असतो, विकेंड ला खूप मुड.
25- जेवणामध्ये माझा, पकडू शकत नाही कोणी हात,
___________ रावांना खायला घालेल, बिर्याणीचा भात.
26- आजारी पडल्यावर, बरे होण्यासाठी लागते गोळी,
__________ छान बनवते, पुरणाची पोळी.
27- आकाशात चंद्र आहे, चांदणीचा संगती,
________ रावांची आणि माझ्या घरची, जेवायला बसली पंगती.
28- इंस्टाग्रामच्या बायोला, टाकला आहे फुडी,
______ राव आहेत खूप मुडी.
29- छान छान, देशी-विदेशी पदार्थ, जाणून घ्यावे,
_____ राव लग्न होताच माझी ईच्छा आहे, मला नवीन नवीन पदार्थ खिलवावे.
आणखी वाचा- विनोदी उखाणे महिलांसाठी खास < – क्लीक करा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.