Marathi Ukhane For Male | मराठी उखाणे नवरदेवासाठी funny
Ukhane For Male हे खास पुरुषांसाठी बनवले आहेत. हि वेबसाईट खास करून उखाणे साठीच आहे. महाराष्ट्रात उखाणे घेणे हि फार जुनी परंपरा आहे आणि ती नेहमी कायम राहणार आहे. नवीन नवरा बायको यांना लग्न झाल्यानंतर उखाणे घ्यावेच लागतात त्याशिवाय घरी पाऊल ठेवायला देत नाही.
1- वाटेतून जाताना मुली, मला बघून होतात Blush,
________ बाथरूम वरून आल्यानंतर, नेहमी करत जा flush.
2- बिगबॉस शो, सलमान खान करतो HOST ,
_________ जेव्हा मेकअप काढते, तेव्हा दिसते GHOST.
3- मित्रांनी कॉलेजमध्ये, तुझ्या नावानी खूप चिडवल,
आणि अखेर _________ तुलाच मी, बायको म्हणून निवडल.
4- कोणाकडे इगो तर, कोणाकडे अटीट्युड आहे,
परंतु __________ माझी, खूप क्यूट आहे.
5- लग्नासाठी स्थळ बघताना, आई तुझ्यावरच अडली,
नशीब माझ फुटक, आणि ________ गळ्यात पडली.
6- वेडा करून टाकलस, मला तुझ्या प्रेमात,
हो नाही म्हणत लग्न झाले, _________ सोबत जोमात.
7- तुझ्या चेहऱ्यावर राग, तुझ्यासारखाच गोड आहे,
म्हणूनच माझ्या मनाची, _________ तुझ्याकडे ओढ आहे.
8- दूर डोंगरापल्याड नदीकाठी, माझं गाव,
___________ नाव घेतो, मी तिचा राव.
9- दे हाती तुझा, हात मला,
_______ मी देईन, सजणी सुख तुला.
10- चांदीची बरणी, भरली तुपाने,
घर आमचे दरवळले, ________ च्या रूपाने.
11- नजरेतील मादकता, घायाळ करते हृदयाला,
त्यातूनच ___________ साठी प्रेम येते उदयाला.
12- केस कपाळी, कुरळे कुरळे,
________ ची फाटते जेव्हा, घरात येतात झुरळे.
13- कधी ऐकतो, गीत झऱ्यातून,
__________ चे नाव घेतो, नेहमी मनातुन.
14- सांभाळ तू माझे मला, माझ्या नव्या फुला,
________ मी सावली होऊन, नेहमी साथ देईन तुला.
![](https://www.ukhane.in/wp-content/uploads/2020/04/output-onlinepngtools3.png)
![](https://www.ukhane.in/wp-content/uploads/2020/06/Marathi-Ukhane-For-Female-386x386.webp)
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
![](https://www.ukhane.in/wp-content/uploads/2020/04/funny-ukhane-in-hindi-386x386.png)
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
![](https://www.ukhane.in/wp-content/uploads/2020/05/funny-marathi-ukhane-for-bride-1-386x386.png)
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.