Marathi Ukhane For Husband
Marathi Ukhane For Husband हे खास नवरी आपल्या नवऱ्यासाठी घेतील. हे उखाणे एकदम नवीन आहेत जे तुम्हाला कुठेच नाही भेटणार. उखाणे घेणे हि महाराष्ट्रात लग्नामध्ये प्रथा असते. हि प्रथा अशीच कायम राहण्यासाठी आम्ही या वेबसाईटच्या माध्यमाने नवीन उखाणे आणत असतो.
Marathi Ukhane For Husband हे अगदी सोपे आणि मजेशीर आहेत जे सर्वांना फार आवडतील. अश्याच उखाणेसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत रहा. हे उखाणे आवडल्यास नक्की शेयर करा.
Marathi Ukhane For Husband in Marathi
1- सुगंधाने झाले धुंद, जीव झाला ग बेबंद,
______ रावांशी लग्न करून, सर्वांना भेटला आनंद.
2-घरी बघण्यासाठी आली होती, जाधवांची स्वारी,
__________ रावांसोबत करेन आता, पंढरीची वारी.
3- उन्हात काया, मनात छाया,
_______ आणि ________ वर अशीच राहूदे, तुम्हा सर्वांची माया.
4- अशी असावी सांस साजरी, असा असावा वारा,
_________ रावांच्या येण्याने, आनंद झालाय सारा.
5- अवती भोवती डोंगर झाडी, मधी माझी सासुरवाडी,
________ रावांनी आणली मला नेसायला, पैठणी साडी.
6- तुफान दर्या, चंदेरी रात,
_______ रावांनी दिला मला, आयुष्यभरासाठी हातात हात.
7- कान्हा फोडतो, दह्या दुधांचे माट,
______ रावांचे नाव घेते, सोडा आमची वाट.
8- घडोघडी मनोमनी, भास नवे नवे,
_______ राव मला ७ जन्मासाठी हवे.
9- आतुर धरणी, भेट नभाला,
_______ राव भेटले, माझ्या सुखाला.
10- असा लाजरा बाजरा ,प्रणय असावा,
_____ तुझी सावली त्यात, घेते मी विसावा.
11- आयुष्याचे हे चक्र चालते, साद घालते आशा,
________ रावांचे नाव घेताना, येत नाही कधी निराशा.
12- गळ्यात विना, चिपळ्या हाती,
________ रावांचे नाव घेते, आम्ही सुखी आहोत कारण महाराष्ट्राची माती.
13- तू दिलेल्या दुःखाने, मला बरेच काही शिकवले,
अखेर जग कसे असते शेवटी ________ रावांनीच मला दाखवले.
14- मायबाप सेवा, पवित्र हे कर्म,
________ रावांची सेवा करणे, हाच माझा धर्म.
15- जगाला नाही मंजूर, राया आपली प्रिती,
_________ रावांचे नाव, नेहमी माझ्या ओठी.16- उजळेल रोज माझी नयनी, तुझ्या उषा,
__________ राव दाखवतील, तीच पूर्व दिशा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.