Marathi Ukhane | मराठी उखाणे
Marathi Ukhane हे उखाणे खास स्त्री आणि पुरुष दोघांसाठी लिहिले गेले आहेत. उखाणे घेणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे ती आपण कायम ठेवूया आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील उखाणे किती महत्त्वाचे आहेत ते समजवूया. उखाणे घेताना पाहुण्यांच्या तोंडावर एक वेगळाच आनंद असतो.
Marathi Ukhane हे तुम्हाला इंटरनेटवर सध्या भरपूर मिळतील परंतु या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व नवीन प्रकारचे उखाणे बघायला मिळतील. हे उखाणे जर तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि या वेबसाईटला दररोज भेट द्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन उखाणे मिळतील.
1- ईश्वराकडे मी फक्त, एकच मागितलय,
_____________ जेव्हापासून मी, तुला पाहिलय.2- कॉलेजमध्ये असताना, प्रेमात पडले,
_____________ रावांमुळे माझे, आयुष्य घडले.3- मी एक नौका, तू एक लहर,
____________ रावांसोबत लग्न होऊन, जीवनात आली बहर.4- जिथे माळला, तिथे खुलून दिसे हा गजरा,
__________ चे नाव घेतो, लागू नको तिला कोणाच्या नजरा.5- प्रत्येक समस्येचा होतो, शेवटी अंत,
_________ राव सोबत असताना, मला नाही कसली खंत.6- मला मनाला भिजणारा, हा श्रावण मास,
___________ रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास.7- सोन्या चांदीच्या दागिन्यांची, नाही मला हौस,
____________ रावांसारखा हिरा भेटला, त्यांच्यासोबत करेन मौज.8- तिच्या माझ्या प्रेमाची, गोष्ट आहे खरी,
___________ ला जपून ठेवेन मी, जणू एक परी.9- जडतो तो जीव, लागते ती आस,
___________ रावांना केले मी, बघण्याच्या कार्यक्रमातच पास.10- दाटते ती माया, सरे तोच काळ,
_____________ सासरी येताना, भरून आले आभाळ.11- झाले आज खरे, जे होते मनी,
_____________ राव झाले माझे, सौभाग्याचे धनी.12- चंद्राची सावली पडते, घराच्या अंगणात,
_________ रावांचे नाव घेते मी पडली त्यांची पत्नी नात्याच्या बंधनात.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.