Marathi Propose Ukhane | मराठी प्रपोज उखाणे.
उखाणे भरपूर प्रकारचे असतात त्यापैकी Marathi Propose Ukhane हा एक प्रकार आहे. उखाणे खूप छान मानले जातात नवीन वधू आणि वरासाठी. वधू आणि वर जेव्हा घरी प्रवेश करतात तेव्हा हे उखाणे घेतले जातात.
Marathi Propose Ukhane सध्याच्या पिढीमध्ये खूप जलद गतीने वाढत चालले आहे. उखाणे बोलण्याच्या वेळी लोक खूप हसतात आणि आनंद घेतात एक दुसऱ्याच्या वाक्यांमधून. उखाणे हे फार आधीच्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे.
1- आमच्या लग्नासाठी, नाही केला कोणी अपोज,
_______ ला मारतो आज, सगळ्यांसमोर प्रपोज.
2- बघून होतो तुला, माझ्या हृदयाचा घात,
______ सांग कधी बायको बनवून न्हेऊ ______ च्या घरात.
3- कॉलेज मध्ये घालवलेला टाइम, डोळ्यासमोर आन,
______ मी तुझ्यावर किती प्रेम करतो, हे न सांगता जाण.
4- समुद्रामध्ये फिरण्यासाठी, लागते होडी,
______आणि _____ ची नेहमी, सुखी राहूदे जोडी.
5- ताऱ्यांच लुक लुकण, चंद्राला आवडलं,
_______ ला जीवनसाथी, म्ह्णून मी निवडलं.
6- काश्मीरचा बर्फ बघून वाटते, आलो स्वर्गात,
______ रावांनी प्रपोझ केला मला, १५ विच्या वर्गात.
7- आपल्या लग्नाला, सर्वांचा होकार हाय,
_________ तुला विचारतो, माझ्याशी लगीन करशील काय.
8- गावी तुळशीचे झाड असते, सर्वांच्या घरोघर,
_______ झालीस माझी आता, चल मुंबईला बरोबर.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.