Kolhapuri Ukhane For Male & Female
Kolhapuri Ukhane हे खास आपल्या कोल्हापूरच्या प्रेक्षकांसाठी बनवले आहेत. असे कोणीही घेऊ शकतात हे उखाणे. उखाणे घेण्याची प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि याची मज्जा फार निराळी आहे. या वेबसाईट मध्ये तुम्हाला नवीन प्रकारचे उखाणे बघायला मिळतील तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर नक्की इतरांसोबत शेअर करा.
1- कोल्हापूरला फेमस आहे, तांबडा पांढरा रस्सा,
________ रावांचे नाव घेताना, बसला माझा घसा.
2- कोल्हापुरात आहे, महालक्ष्मी देवीचे स्थान,
______ रावांचे नाव घेताना, मला वाटतो अभिमान.
3- कोल्हापूरला लाभली आहे, पंचगंगा नदी,
_________ रावांचे नाव घेते, बोलू नका कोणी मदी.4- कोल्हापूर म्हणजे, छत्रपती शाहू महाराजांचे स्थान,
_________ रावांचे नाव घेताना, वाटतो मला अभिमान.
5- कोल्हापूरकरांचा, करू नका नाद,
_________ रावांचे नाव घेते, आता घालू नका वाद.
6- कोल्हापूरची स्टाईल, आहे जगात भारी,
_______ सोबत करेन आता, पंढरपूरची वारी.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.