101 Jay Bhim Ukhane Marathi | जय-भीम मराठी उखाणे.
Jay Bhim Ukhane हे खास आपल्या बुद्धिस्ट समुदायासाठी बनवले गेले आहेत. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांना नमन करतो. उखाणे म्हंटले कि महिलांमध्ये याची फार आवड असते.
उखाणे न घेतल्याशिवाय लग्न अपुरे वाटते. Jay Bhim Ukhane तुम्हाला इंटरनेट वर फार कमी मिळतील. हे उखाणे खूप हटके आणि वेगळे आहेत जे तुम्ही आपल्या जीवनसाथी साठी घेऊ शकता. लग्न ठरले कि उखाण्याचा शोध खूप होतो. या वेबसाईट वर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील.
1- जरी संकटाची काळ रात होती, तरी भिमराया तुझी साथ होती,
सर्वजण म्हणतात _____ आणि _______ ची जोडी जसे शिंपल्यात मोती.
2- अभिमानाने दयावा लागेल, जयभीम चा नारा,
_______ रावांचे नाव घेऊन करूया भारत, बुद्धमय सारा.
3- शिक्षणाचे महत्व समजवले माझ्या भीमाने, मान वर करून जगायला शिकवले माझ्या भीमाने,
____________ रावांशी परिणय घडून आला, सर्वांच्या आशिर्वादाने.
4- शोभून दिसते माता रमाई, आणि भीमबाची जोडी,
_________ रावांशी संसार करण्यात, आहे मला गोडी.
5- जीवन जगावे, बुद्ध धर्माला अनुसरून,
______ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना वंदन करून.
6- बाबासाहेबांनी केल, महार समाजाच सोन,
माझ्या नशिबात आहे, ______ रावांच होन.
7- बाबासाहेबांनी दिला, समानतेचा आणि मानवतेचा संदेश,
_________ रावांसोबत करते, मी गृहप्रवेश.
8- भगवान बुद्धांना पुजते, आणि बाबासाहेबांना करते मी वंदन,
___________ रावांशी जोडते मी, पवित्र बंधन.
9- आज लग्नामध्ये, खूप मोठी होती वरात,
_____ रावांसोबत जयभीम बोलून, पाऊल टाकते घरात.
10- बाबासाहेबांनी दिवस रात्र अभ्यास करून मिळवलेल्या पदव्या, आजही कोणी घेतल्या नाही,
________ सारखी प्रेमळ बायको, शोधूनही मिळणार नाही.
11- कलम आणि कायदा, बाबासाहेबांची लेखणी आहे,
______ माझी, खूप देखणी आहे.
12- भारताच्या तिरंग्याला, अशोक चक्राची खून,
_____ रावांचे नाव घेते ______ ची सून.
13- गौतम बुद्धांच्या विहाराला, सोन्याची विट,
______ रावांचे नाव घेते, लक्ष ठेवा नीट.
14- भारत देश चालतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर,
__________ रावांनी अखेर कब्जा केला, माझ्या मनावर.
15- डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे, आज जनता आहे सुखी,
______ रावांचे नाव, सदा माझ्या मुखी.
16- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, भारत देशाची शान,
_______ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
17- छत्रपती शिवाजी महाराजांचे, स्वराज्य समोर ठेवून बाबासाहेबांनी लिहिले संविधान,
____________________ रावांशी माझे नाते जुळले, म्हणून आहे मी समाधान.
18- वोडाफोन, एयरटेल पेक्षा, भारी आहे जिओ सिम,
______ आणि _____ कडून सर्वांना, मानाचा जयभीम.
19- भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, वंदन करते खाली वाकून,
_________ रावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून.
20- दिवस रात्र एक करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्यायाविरुद्ध झटले,
_______ रावांचे बोलणे, मला पहिल्या भेटीतच पटले.
21- स्त्री पुरुष सर्वाना, समान दिले बाबासाहेबांनी हक्क,
______ सोबत झाले, अखेर माझे लग्न पक्क.
22- जयभीम च नाव, जगी गाजत,
______ राव वरातीत नाचायला, नाही लाजत.
23- भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचा फोटो, आपल्या सर्वांच्या घरी असावा,
________ रावांचा सहवास, मला प्रत्येक जन्मी मिळावा.
24- डॉ. बाबासाहेबांसारखा महामानव, पुन्हा कधी जन्म घेणार नाही,
_______ रावांसारखे पती, शोधूनही मिळणार नाही.
25- माता रमाईने बाबासाहेबांना, नेहमी दिली साथ,
_____ रावांचे नाव घेते, सर्वांच्या आशीर्वादाने घ्या आत.
26- बहुजन समाजावर केली, भीमाने किमया न्यारी,
________________ राव आहेत, सर्वात भारी.
आणखी वाचा- छत्रपती शिवाजी महाराजांचे उखाणे <—–क्लीक करा.
27- लहानपणापासून ऐकली आहे, बाबासाहेबांची कथा,
_________ सोबत बुद्धिस्ट पद्धतीने लग्न करून, कायम ठेवली प्रथा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.