Home Minister Ukhane Marathi | होम मिनिस्टर उखाणे.
Home minister ukhane हे फार लोकप्रिय आणि मजेदार आहेत. होम मिनिस्टर हा सिरीयल तर तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. या कार्यक्रमात महिला आपल्या पतीसाठी उखाणे घेतात. हा कार्यक्रम महाराष्ट्रत खूप लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमात अनेक खेळ खेळले जातात त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय मनोरंजक आहे.
ह्या पोस्टमध्ये आपण Home Minister Ukhane उखाणे बघणार आहोत. तुम्ही हे उखाणे कोणत्याही कार्यक्रमात घेऊ शकता. जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर तुम्ही तुमच्या मित्र परिवारांना सोबत हे उखाणे शेअर करू शकता. उखाणे घेणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे ही परंपरा नेहमी अशीच कायम राहील.
Home Minister Ukhane List
1- पैठणी घालण्यासाठी, मी फार आहे हौशी,
________ रावांचे नाव घेते, होम मिनिस्टरच्या दिवशी.
2- होम मिनिस्टर ची तयारी करण्यासाठी, मी काम दिले आहे टाकून,
_________ रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.
3- कोकणातील फेवरेट डिश, आहे पिठी,
__________ रावांना मारते मी, सर्वांसमोर मिठी.
4- आदेश बांदेकर येणार म्हणून, घर आमचे भरले,
_________ रावांचे नाव घेण्यास, मी कधीही नाही विसरले.
5- आज तुम्ही घरी आलात म्हणून, दिवस आहे झक्कास,
_________ रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास.
6- होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी मलाच माहीत नाही, मी कशी झाली सिलेक्ट,
लग्नाच्या आधीपासूनची_______ रावांची मी, एक एक आठवण केली आहे कलेक्ट.
7- होम मिनिस्टर म्हणजे, महिलांचा खेळ,
_______ रावांचे नाव घेते, होम मिनिस्टर ची वेळ.
8- गणपती बाप्पाला आवडतो मोदक, आणि कृष्णाला आवडते लोणी,
___________ रावांचे नाव घेते, आज अडवू नका कोणी.
9- नागपूरला इंग्रजीमध्ये म्हणतात, ऑरेंज सिटी,
_________ राव पळून येतात, जेव्हा मी मारते शिटी.
10- छोटस घरकुल माझं, सामावून घेते साऱ्यांना,
_______ रावांची प्रेमळ साथ, तृप्त करते मनाला.
11- वडाच्या झाडाचे, फार मोठे खोड,
_________ रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.