50+ Gruhpravesh Ukhane in Marathi | गृहप्रवेश उखाणे मराठी.
Gruhpravesh Ukhane in Marathi हे नवीन नवरा आणि नवरी जेव्हा घरात प्रवेश करतात त्यावेळी खास घेतले जातात. घरात प्रवेश करताना गृहप्रवेश उखाणे घ्यावेच लागतात त्याशिवाय पाहुणे मंडळी नवरा नवरीला घरात प्रवेश करू देत नाही.
हे खूप लोकप्रिय आहेत. या वेबसाइट वर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे भेटतील आणि ते तुम्ही सहज कॉपी आणि शेयर करू शकता. गृहप्रवेश करताना नवीन नवरा नवरीला हे उखाणे घ्यावेच लागतात. हे उखाणे अतिशय सोपे आहेत. उखाणे घेण्याचा महिलांमध्ये फार उत्साह असतो.
Gruhpravesh Ukhane in Marathi For Female.
1- पतिसेवा हे, ब्रीद आपुले,
________ रावांचे नाव घेऊन, घरात टाकते पाऊले.
2- माहेरचे निरंजन, सासरची वात,
________ रावांचे नाव घेऊन करते, संसाराला सुरवात.
3-नवीन पुस्तके वाचून, घ्यावा त्यातून बोध,
_____ रावांच्या जीवनात लागला, सुखाचा शोध.
4- आमच्या दोघांच्या जोडीला, आशिर्वाद तुमचा हवा,
_______ रावांसोबत आजपासून, संसार थाटेन नवा.
5- जाधवांच्या घरी कधी जाते, याची लागली होती चाहूल,
______ रावांच्या संसारात, आज टाकते पहिले पाऊल.
6- आजच्या शुभ दिवशी, झाले आमचे लग्न आणि आली वरात,
_____ रावांच्या नावाने, पहिले पाऊल टाकते घरात.
7- संसाराच्या वाटेवर, आम्ही दोन प्रवासी नवे,
श्री. _____ व सौ. _______ ला, तुमच्या सर्वांचा आशिर्वाद हवे.
8- त्यांचा छंद आहे क्रिकेट, आणि माझा खो-खो खेळ,
_____रावांचे नाव घेते, कारण आहे गृह्प्रवेशाची वेळ.
9- ____ची लेक झाली_____ ची सून,
___ रावांच नाव घेते, गृहप्रवेश करून.
10- जमले आहेत सर्व आज, आमच्या लग्नाकरता दारात,
______ रावांचे नाव घेते, येऊ द्या आता घरात.
11- लग्नाची तारीख १२ आणि १.३० ची होती वेळ,
_______ रावांचं नाव घेते, वाजवून घराची बेल.
12- कपाळावरील कुंकू देतो, आयुष्याला अर्थ नवा,
_______ रावांचे नाव घ्यायला, वेळ कशाला हवा.
13- आमच्या लग्नासाठी, छान केला सर्व थाट,
______ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
14- लग्नाचे ७ फेरे आहेत, ७ जन्माच्या गाठी,
______ रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी.
15- मासे पकडायला लागल्या, समुद्रावर नौका,
_______ रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.
16- वडिलांनी केले लग्न, भावांनी दिले आंदण,
मामांनी केला आहेर, ________ रावांसाठी सोडले प्रेमाचे माहेर.
17- सोन्याचे कलश, चांदीची परात,
_______ रावांचे नाव घेते, नव्या घरात.
18- माहेरच्या ओढीने, डोळे येतात भरून,
______ रावांच्या संसारात, मन घेते वळून.
19- द्वारकेत कृष्ण, अयोध्येत राम,
_______ रावांचे चरण, हेच माझे चारही धाम.
20- कोकणात जाताना, लागते जंगल घनदाट,
________ रावांसोबत बांधली, अखेर जीवनगाठ.
21- तुमच्यासोबत माझे, नवीन नाते जुळले,
______ रावांसोबत माझे, जीवन फुलले.
22-लोणावळा ला जाताना, धुके पडले दाट,
_____ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
23- कृष्ण वाजवतो, गोकुळात बासरी,
_____ रावांसोबत आली, मी सासरी.
24- मराठी भाषा आहे, महाराष्ट्राची अस्मिता,
_______ राव माझे श्रीराम, आणि मी त्यांची सीता.
25- एका मुलीच्या प्रेमात, होतो मी सायको,
आज _________ च, मी घरी बनवून आणली बायको.
26- उंबरठयावर ठेवलेले माप, पायाच्या स्पर्शाने लवंडते,
_______ रावांची पत्नी या नात्याने, गृहप्रवेश करते.
27- जरी हाईट असली _______ ची छोटी,
तरी आहे ती, मनाने खूप मोठी.
28- लग्नामुळे दोन घर जुळतात, सासर आणि माहेर,
आपण सर्व आज उपस्तीथ राहिले, हाच आहे आमचा आहेर.
29- आहे मी प्रेमळ, नाही मला कोणाचा द्वेष,
_____ रावांचं नाव घेऊन, करते गृहप्रवेश.
30- लग्नात महत्वाचे, फेरे असतात सात,
_____ आणि______ वर नेहमी असुद्या, आशीर्वादाचा हात.
31- चालले होते सुखाने, वाहे उधाण वारे,
_________ रावांचे नाव घेऊन, पाऊल टाकते आत, ऐका सारे.
32- कुलदेवतेला स्मरून, वंदन करते देवाला,
_______ रावांचे सौभाग्य, अखंड दे मला.
आणखी वाचा—>सत्यनारायण पूजा उखाणे<—क्लिक करा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.