Connect with us

100 Top Funny Ukhane in Marathi for Female | मराठी विनोदी उखाणे.

funny ukhane

Funny Ukhane हे खास वधू आणि वरासाठी बनवले गेले आहेत. हे अतिशय कॉमेडी आहेत. तुम्हाला वाचायला नक्की आवडतील. उखाणे हे लग्नात घेणे आवश्यक आहे. नवीन नवरी जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा उखाणे हे घ्यावेच लागतात.

WhatsApp Group Join Now

Funny Ukhane हे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेयर करू शकता. उखाणे घेणे हे नवरीला फार आवडते. मुलींसाठी आपल्या पतीचे नाव सर्वांसमोर घेण्याची हि पहिलीच वेळ असते.

1- संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा,
मी केला पसारा तर तो, ________ रावांनी आवरायचा.

2- महाराष्ट्रात एक, फेमस जंगल आहे ताडोबा,
____________ राव बाहेर आहेत मांजर, आणि माझ्यासमोर बनतात वाघोबा.

3- कुणी जुगार सट्टेबाज, कोणी खेळतो मुंबई मटका,
________________ अहो कमी खेळा, नाहीतर एक दिवस बसेल मोठा फटका.

4- 9 to 5 जॉब करून, आयुष्याची लागली आहे वाट,
मी जॉब सोडणार आता, कारण_______________ रावांचे बिझनेस आहेत सतराशे साठ.

5- पाहुण्यांसाठी कितीही करा, ते ठेवतात नावे,
___________ रावांचे नाव घेते सर्वांनी ऐकले असेल तर, आप आपल्या घरी जावे.

6- सोसता सोसेना हा, संसाराचा ताप,
________ राव अजूनही सुधरले नाहीत, होऊन २ मुलांचे बाप.

7- समुद्र कितीही खवळला तरी, किनाऱ्यावर आदळतात लाटा,
___________ राव कितीही पिले तरी, विसरत नाही घरच्या वाटा.

8- तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,
______रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.

9- कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,
________ राव आहेत, माझ्यासाठी पागल.

10- उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,
तरीपण ________ राव आहेत, माझे मोठे फॅन.

11- प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,
पण_______रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.

12- प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी,
_______ राव आहेत, एक नंबर चे छपरी.

13- छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा,
_____ राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा.

14- बोलणे आहे ह्यांचे, मधापेक्षा गोड,
_____ राव काढतात नेहमी, मुलींची खोड.

15- पाहुणे आहेत वरातीमदे, पिऊन तराट,
________च नाव घेऊन, प्रवेश करते घरात.

16- भारताचा कर्णधार, विराट कोहली आहे ऑलराऊंडर,
____________आहेत डॉक्टर, आणि मी त्यांची कंपाऊंडर.

Marathi Dialogue Status <— क्लिक करा

16- आंब्यामध्ये लोकप्रिय आहे, हापूस आंबा,
______ च नाव घेते, सगळ्यांनी थांबा.

17- गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या,
_____ आहे माझा, हार्दिक पंड्या.

18- व्हीस्की पेक्षा, छान आहे वोडका,
________आपल्या लग्नानंतर, भाजी बनवेल मी दोडका.

19- हजार कमी पडतात, लाखाशिवाय बात नाही,
_______ रावांचा FB वर फोटो लाईक केल्याशिवाय, पोरी राहत नाही.

20- चहा सोबत लागतो, चांगला मस्का पाव.
_______रावांची बाहेर किती लफडी, ते विचारू नका राव.

21- ताटात होती जिलेबी, त्याला लागली मुंग्यांची रांग,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या नानाची टांग.

22- दारूच्या नावाने, नेहमी असते बोंब,
______ अहो कमी प्या, नाहीतर येतील कोंब.

23- नळावर पाणी भरताना, मारायचे लाईन,
______ रावांनी अखेर केले, कोर्ट मॅरेज करून पेपर साईन.

24- आय लायनर लावला कि, मुली दिसतात छान,
________ राव नेहमी, माझा मेकअप करतात घाण.

25- कारल्याची भाजी, लागते खूप कडू,
_______ रावांचे प्रवचन ऐकून, लागतात कान सडू.

26- गाजर खायला, आवडते सशाला,
_______च नाव घ्यायला, आग्रह कशाला.

27- हाताची घडी , तोंडावर बोट,
_______ डोकं नसेल चालत, तर मारा एक व्हिस्की चा घोट.

28- फालुदा छान लागतो, जेव्हा असतो त्यात सब्जा,
___________रावांच्या जीवावर, करेन मी मज्जा.

29- बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा,
तरीपण _________ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

30- पिऊन आल्यावर, अंगात येतो खूप जोश,
मला बघताच, _______ रावांचे उडतात होश.

31- नवरात्रीमध्ये गरबा खेळताना, झाली पहिली भेट,
_________रावांची झाली, मी बायको सेट.

32- नाग पंचमिला नाग, प्यायला येतो दूध,
______ राव पिऊन आले कि, नसते त्यांना कसली सुध.

33- बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू,
_______ राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू.

34- ________ राव आणि माझा, संसार होईल सुखर,
जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ते लावतील कुकर.

35- हळदीमध्ये पाहुणे पिऊन, झाले आहेत टाईट,
_______ राव कमी प्या, पोट वाढल आहे, आता जीन्स होईल टाईट.

36- लग्न करण्याच्या आधी, खूप केले होते वादे,
________ राव दिसतात, तेवढे नाही आहेत साधे.

37- खुर्चीत खुर्च्या, प्लास्टिकच्या खुर्च्या,
_______ रावांच्या बहिणी, जशा खुरासणी मिर्च्या.

38- लग्न किती पण चांगले करा, पण काही लोक ठेवतात नावे,
______ रावांची इच्छा आहे, अशा लोकांना २ कानाखाली ठेवून द्यावे.

39- सर्व मिळून नाचू उडू, घालूया फुगड्या,
सासरच्या महिला रुसल्या, कारण ________ रावांनी नाही दिल्या, त्यांना लुगड्या.

40- अर्ध्या वाटेत, काटा मला लागला,
_______ रावांचे नाव घेते, त्यांच्या डोक्यावर कावळा हागला.

41- कोणाला आवडतो BJP, तर कोणाला SHIVSENA पक्ष,
___________ राव मला आवडतात, कारण ते आहेत अपक्ष.

42- उष्णता खूप वाढली म्ह्णून, ह्यांनी आणली कुल्फी,
__________ रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी.

43- थंडी सहन होत नाही, तर हात ठेवा शेकोटीच्या ज्वालांवर,
__________ मी नाचणार नाही, नेहमी तुमच्या तालांवर.

44- _________ रावांना आहे, नोकरी सरकारी,
म्हणून तर मी घेऊ शकले, उंच भरारी.

45- थंडी गुलाबी, हवा हि शराबी,
खिशात पैसे नसले तरी, _________ रावांचे शॉक आहेत नवाबी.

46- लग्न एकदाच होते, करा जपून,
__________ पिऊन आले कि, मी बसते लपून.

47- कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे,
_________ रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे.

48- आवाज ऐकू येत नाय तर, करा साफ कान,
_______रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

आणखी वाचा- Marathi Chavat Ukhane Marriage | लग्नाचे चावट उखाणे. <——क्लीक करा.

Funny Ukhane in Marathi For Male | फणी उखाणे | उखाणे मराठी कॉमेडी.

Funny Marathi Ukhane हे फार विनोदी आहेत. भारतामध्ये लग्नकार्यात उखाणे म्हणण्याची प्रथा आहे. लग्न कार्य म्हणजे आनंदाचा क्षण. अशावेळी नवरी आणि नवरा हे उखाण्याच्या शोधा मध्ये असतात. या वेबसाइट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे भेटतील.

काही जणांना उखाणे माहित नसतात तेव्हा त्यांना कोणीतरी नातेवाईक कानात सांगतो एखादा उखाणा. हा क्षण नवरा नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी आनंदाचा असतो. उखाणे खूप प्रकारचे आहेर त्यापैकी हा एक प्रकार आहे. Funny Marathi Ukhane तुम्ही डाउनलोड आणि शेयर करू शकता.

1- प्रेमात झालो हिच्या मी, वेडा पिसा,
_____________ ने केला माझा, खाली खिसा.

2- लग्न केल्यावरच कळतो, लग्नाचा लाडू,
_____________ ला काय बोलो कि, भेटतो मला झाडू.

3- मुली पाणीपुरी खाताना, भैयाला बोलतात और तिखा दो,
________ अग हगवण लागेल, तुझ्या आईचा घो.

4- फुलांचा राजा आहे गुलाब,
__________ला होतात, नेहमी जुलाब.

5- खायला आवडतो सर्वाना, बासमती तांदूळ,
______ झोपते अशी, जसा रेंगतो गांडूळ.

6- काम नाही येत, होते नेहमी गडबड,
_________ करते नुसती, फुकटची बडबड.

7- कामाला जाताना, लावते नेहमी लायनर,
________माझी बायको आहे, खूप शायनर.

8- मेकअप केला कि दिसतात लोक, हिरो- हिरोईन सारखे,
पण _____ चे नाक आहे, डुकरासारखे.

9- झोप नीट लागावी म्हणून, मानेखाली घेतली उशी,
________माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

10- तुझी आई माझी सासू, आणि माझी आई तुझी सासूबाई,
_________ मला लग्नानंतर, करून टाक घरजावई.

11- लग्नात उभे राहून, कंबर खूप मोडली.
_____ साठी मी आजपासून, दारू सोडली.

12- लहानपणी खेळायचो खेळ, तळ्यात मळ्यात,
______ पडली अखेर, माझ्या गळ्यात.

13- स्कुटी नीट येत नाही, तरी चालवते पाय घसरत,
_______ खूप करते, स्कुटी चालवताना कसरत.

14- टीव्ही सिरीयल बघून, बायका झाल्या आहेत पागल,
_____ तू नको बघूस, नाहीतर तुलापण वेड लागल.

15- ट्रेन ची तिकीट काढण्यासाठी, खूप होती लाईन,
_____ ला भेटण्यासाठी गेलो दादरला, आणि तिकीट नव्हती काढली म्हणून पडली फाईन.

16- परीक्षेत नापास होतात, तरी घेतात विद्यार्थी पुरवणी,
____ ने आणल्या, स्वतःसोबत २ करवली.

17- पुणेरी मिसळ, लागते खूप चमचमीत,
______ खाऊन खाऊन, झाली आहे टमटमीत.

18- साड्यांचा सेल लागला, महिलांनी केली गर्दी,
______ ने खाली रात्री आईसक्रीम, आणि झाली सर्दी.

19- आजारी माणसाला देतात, नारळाचं पाणी,
_________ दिसते, बिना चष्म्याशिवाय कानी.

20- चहा थंड करायला, लागते बशी,
______ च वजन खूप आहे, उचलून घरात नेहू कशी.

21- महिलांना बडबड करण्याची, असते खूप हाऊस,
____ च नाव घेतो, आमच्या लग्नात पडला पाऊस.

22- बघायला आलो तेव्हा तोंडातून हिच्या, शब्द निघेना,
__________ च आता माझ्याशिवाय, पान हलेना.

23- घरात आमच्या, असतो खूप पसारा,
_________ आहे माझी, कर्जत कसारा.

24- __________ साठी ताजमहल तर, मीपण बनवला असता,
जर मुमताज आणि शाहजहान, तेव्हा नसता.

25- बघणार असेल कोण तर, दाढी करण्यात अर्थ आहे,
_______ बघणार असेल तर, अंघोळ करणे सुद्धा व्यर्थ आहे.

26- करतो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम,
_______ ला उचलायचं असेल, तर लागेल क्रेन.

27- मला नाही वाटत पाल, कॉक्रोच ची भीती,
_______ आहेत माझे कबीर सिंग, आणि मी त्यांची प्रिती.

28- शेरवाणीला लावल मी, सोन्याच बटन,
_________ आहे माळकरी म्हणून सोडल मी, चिकन आणि मटण.

29- सरकारी नोकरी म्हणून, पडली माझ्या गळ्यात,
________ ला घेऊन जातो आता, आमच्या मळ्यात.

30- रुप्याचा लोटा, सोन्याची झारी,
असली काळीसावळी, तरी _______ माझी प्यारी.

Ukhane Comedy list in Marathi | उखाणे मराठी कॉमेडी.

येथे तुम्हाला Ukhane comedy list भेटेल. भारतात लग्नामध्ये उखाणे खूप मोठ्या प्रमाणात घेतले जातात. काही उखाणे खूप हसण्यासारखे असतात. या वेबसाइटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे भेटतील.

नवरा आणि नवरी हे उखाने अगदी सहजपणे वापरू शकतात. उखाण्याशिवाय लग्न अपुरे असते. येथे तुम्हाला नवीन उखाणे नेहमी वाचायला भेटतील. Ukhane comedy list मध्ये खूप विनोदी उखाणे मिळतील तुम्हाला.

1- मुलांना आवडते, फिगर झिरो,
_______ राव असले काळे तरी, माझ्यासाठी आहेत हिरो.

2- जोरदार वाऱ्याने, घरावरचे पत्रे गेले उडून,
________ रावांचे कमी वयात, टक्कल पडले पुढून.

3- संध्याकाळ झाली कि पुरुषांना, दारू शिवाय दिसत नाही काय,
________ रावांसोबत लग्न करून, झक मारली कि काय.

4- महिलांची जीभ चालते, दिवस-रात्र वटवट,
_______ ची असते, नेहमी कटकट.

5- थंडी मध्ये पितात, व्हिस्की आणि रम,
________ रावांना पिल्यानंतर, नसते कोणते गम.

6- पेट्रोलचा भाव, झाला आहे शंभर,
______ रावांचा नेहमी, बिझी लागतो नंबर.

7- इंग्लिशमध्ये पतंगाला, म्हणतात काईट,
______ राव आज होऊन आले आहेत, फुल टाईट.

8- देवदासला वेडी करणारी, होती पारू,
________ तुझ्यासाठी, सोडेन मी आजपासून दारू.

9- मुंबईला असताना, पटवल्या असतील खूप पोरी,
_________ रावांच्या गळ्यात पडली, गावची छोरी.

10- नको मुंबई, नको पूना,
___________ राव मला, हनीमुनला न्ह्या गोवा.

Marathi Vinodi Ukhane | मराठी विनोदी उखाणे.

Marathi Vinodi Ukhane हे फार गमतीदार आहेत. हे उखाणे नवरा आणि नवरी दोघांसाठी आहेत. उखाणे घेणे हे महिलांना फार आवडते काही पुरुषांना देखील आवड असते. लग्नात उखाणे घ्यावेच लागतात.

उखाणेचे खूप प्रकार आहेत त्यापैकी Marathi Vinodi Ukhane हा एक प्रकार आहे. हे उखाणे घेताना फार हसू येते. हे उखाणे तुम्ही सहज शेयर करू शकता आणि आपल्या जोडीदारासाठी घेऊ शकता.

1- प्रपोझ केला, घेऊन गुलाबाचं फुल,
______ लग्न झालं, आता करूया मुल.

2- दिवसभर आवडत, महिलांना चरायला,
________ नेहमी कंटाळा करते, स्वयंपाक करायला.

Marathi Comedy Ukhane | दमदार कॉमेडी उखाणे.

Marathi Comedy Ukhane हे खूप विनोदी आहेत . हे उखाणे घेताना पाहुणे मंडळी पोट धरून हसेल. लग्नात उखाणे घेण्याची संधी एकदाच भेटते आणि हि संधी अविस्मरणीय असते. उखाणे म्हंटले कि काही लोक खूप लाजतात. महिलांना उखाणे घेण्याची खूप आवड असते.

उखाणे भरपूर प्रकारचे आहेत त्यापैकी Marathi Comedy Ukhane हा एक प्रकार आहे. उखाणे घेताना सर्व लोक मज्जा घेतात. हे उखाणे तुम्ही डाउनलोड आणि शेयर करू शकता.

1- देवदासला वेडी करणारी, होती पारू,
______ तुझ्यासाठी, सोडेन मी आजपासून दारू.

2- मुंबईला असताना, पटवल्या असतील खूप पोरी,
________ रावांच्या गळ्यात पडली, गावची छोरी.

3- बंद करा बँजो, उभे राहून दुखले आमचे पाय,
_______ राव बघा, कुठे पडले कि काय.

4- मुंबई मध्ये मेट्रोचे काम झाल्यावर, लोक होतील सुखी,
_______ राव नाही होणार मग, कामावर जायला दुखी.

अविवाहित उखाणे वाचा <—- क्लीक करा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Festival Ukhane

काकवी पासून बनवतात गुळ, ___रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ

close