20+ Fauji Ukhane in Marathi | फौजी उखाणे | Marathi Ukhane For Fauji.
Fauji Ukhane in marathi हे खास सैनिकांसाठी आहेत. एखादी स्त्री जेव्हा Fauji सोबत लग्न करते तेव्हा ती हे उखाणे त्यांच्यासाठी बोलू शकते. फौजी आहेत म्ह्णून आपण आज आपल्या घरी सुरक्षित आहोत. भारताची परंपरा आहे लग्नात उखाणे घेणे.
लग्नकार्यात उखाणे घेणे हि फार आधीपासून चालत आलेली परंपरा आहे जी अजूनही चालत आहेत. महाराष्ट्रात सैनिकांना फौजी या नावाने ओळखतात. एखादी नवीन नवरी आपल्या फौजीसाठी उखाणे बोलते तेव्हा तो तिच्यासाठी अत्यन्त आनंदाचा क्षण असतो. फौजी म्हणजे आपल्या देशाची शान आहे. Marathi ukhane for fauji खूप लोकप्रिय आहेत.
1- थकले रे डोळे माझे, वाट तुझी पाहता,
_________ तुझी आठवण येते रोज, डोळ्यातून पाणी न वाहता.
2- फौजिना संपूर्ण जगात, आहे खुप मान,
_____रावांची पत्नी झाले म्हणून, मला आहे अभिमान.
3- फौजी दिवस-रात्र, सीमेवर देतात पहारा,
_____राव आहेत, माझ्या आयुष्याचा सहारा.
4- देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, सीमेवर दिवस-रात्र पहारा आहे,
____ राव आहेत फौजी म्हणून, मला फार अभिमान आहे.
5- तिरंग्याला मी नमस्कार करते, खाली वाकून,
_____राव आहेत फौजी, त्यांच मी नाव घेते सर्वांचा मान राखून.
6- फौजी आहेत देशाची आण, बाण, शान,
______ राव आहेत, माझा स्वाभिमान.
7- कितीही बर्फ पडुदे, तरी फौजी सीमेवर देतात पहारे,
____ रावांच्या आवाजाने, शत्रूच्या अंगावर येतात शहारे.
8- फौजींची स्टाईल आहे, लय भारी,
______ रावांनी पूर्ण केली, माझी इच्छा सारी.
9- कधीही बोलवले कि, व्हावे लागते फौजीना हजर,
_____ रावांना नको लागूदे, कोणाची नजर.
10- रात्रीची स्त्रियांना बाहेर पडण्यासाठी, गंभीर असते स्तिथी,
_____ राव फौजी असताना, नाही कोणाची भीती.
11- फौजीचा पोशाख बघून, ताठ होते मान,
____ राव आहेत ______ घराण्याची शान.
12- फौजी आहेत, देशाच्या पाठीचा कणा,
______ रावांचे नाव घेते, भारत माता कि जय म्हणा.
13- फौजी बनायला लागतो, अंगात जिगर,
_____ राव सोबत असताना, नाही मला कसली फिकर.
14- फौजींच्या त्यागामुळे, स्वराज्य हाती आले,
_________ शी लग्न करून, मनोरथ पूर्ण झाले.
15- तो सीमेवर लढत असतो, म्हणून आपण शांत झोपतो सर्व,
_________ आहेत फौजी, म्हणून आहे मला गर्व.
आणखी उखाणे वाचा- Shivaji Maharaj Ukhane | शिवाजी महाराज उखाणे. <—-क्लीक करा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.