Engagement Ukhane in Marathi for Male
Engagement Ukhane हे खास पुरुषांसाठी लिहिलेले आहेत. पुरुषांसाठी उखाणे इंटरनेटवर तुम्हाला फार कमी मिळतील. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. उखाणे हे भरपूर प्रकारचे आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्कीच आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा.
1- अशी कशी हि, जादू घडली,
माझ्याकडे काहि नसताना, _____________ माझ्या प्रेमात पडली.2- जुळुनी आल्या, रेशीम गाठी,
_____________ तुला बनवले आहे देवाने, माझ्याच साठी.3- पाऊस पडल्यावर, अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी,
_______________ चा मी राजा, आणि ती माझी राणी.4- स्वतःचे घर हीच शांतता, नाही उणे कशाचे,
____________ सोबत संसार सुरु झाला, दिवस आले सुखाचे.5- गंध प्रीतीचा, असतो हळवा,
_____________ सोबत माझे लग्न झाले, माझ्यावर जळणाऱ्याना कळवा.6- छुम छुम पायात पैंजण, आणि कमरेत चांदीचा बंध,
__________________ ला बघताच, उडतो माझा रंग.7- सुख समृद्धी घेऊन आला, आजचा क्षण,
______________ हीच आहे माझे, सर्वात मोठे धन.8- सुखी या क्षणाला, नजर लागो नको कोणाची,
_______________ च नाव घेतो, आहे खूप गुणाची.9- पहिल्या क्षणी भेटताच, हृदयात दिले स्थान,
__________ च नाव घेतो, जय हिंद, जय हिंदुस्थान.10- भक्तीच्या फुलांचा, सुगंधी फुललाय मळा,
______________ ला बघताच, तिचा लागलाय मला लळा.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.