Corona Marathi Ukhane For Male & Female|कोरोना उखाणे.
Corona Marathi Ukhane हे खूप विनोदी आहेत. ज्यांचे कोरोनामुळे लग्न थांबले आहे त्यांच्यासाठी हे उखाणे आहेत. कोरोना ने सध्या संपूर्ण जगाला जगाला हलवले आहे. आणि त्यामुळे बहुतेक लोकांचे लग्न देखील थांबले आहे.
यामध्ये तुम्हाला कोरोनावर आधारित काही उखाणे भेटतील अत्यन्त मजेशीर आहेत हे उखाणे. लॉकडाउन दरम्यान किती काही त्रास झाला लोकांना हे यामधून समजते. Corona Marathi Ukhane हे अतिशय नवीन आहेत.
1- खूप फेमस आहे, पुण्यामध्ये शनिवार पेठ,
______ सगळीकडे जाऊया, लॉकडाउन नंतर भेट.
2- करोनामुळे, कॅन्सल झाली वरात,
______ च नाव घेतो, पटकन घ्या आता घरात.
3- कोरोना काळात, स्वतःची काळजी घेण्यात होते सगळे मग्न,
सॉरी सर्वांना बोलवता आले नाही, ______ रावांसोबत झाले माझे लग्न.
4- कोरोनाच्या महामारीत, कसेतरी झाले आमचे लग्न,
______ रावांच्या संसारात, आजपासून होईल मी मग्न.
5- कोरोनाची आली, दुसरी लाट,
________ आपल्या लग्नाची मी, खूप बघत होते वाट.
6- कोरोनाची आली, दुसरी लाट,
________ रावांसोबत अखेर बांधली, लग्नाची गाठ.
7- कोरोनामुळे लग्नात, जास्त लोकांना नाही परमिशन,
__________ रावांनी दिले मला, त्यांच्या घरी ऍडमिशन.
8- कोरोनामुळे लग्नात आहे फक्त, २५ माणसांची परमिशन,
___________ रावांनी दिले मला, त्यांच्या आयुष्यात ऍडमिशन.
9- कोरोनाची परिस्तिथी, आहे खूप गंभीर,
तरीपण ________ राव लग्नासाठी, उभे राहिले आहेत खंबीर.
10- सारख हाताला सॅनिटायझर लावायचा, आहे मोठा टास्क,
__________ रावांचे नाव घेते, लावून तोंडाला मास्क.
11- सोशल डिस्टन्स पाळत, घेतले आम्ही ७ फेरे,
_________ रावांचे नाव घेते, कोरोना जाऊद्या म्हणा सारे.
12- ए देवा कोरोनाचे संकट, साऱ्या जगातून जाऊदे,
_________ रावांसोबत खंडोबाला, येण्याची संधी मिळूदे.
13- कोरोना लवकर जाओ, अशी सर्वांची आहे ईच्छा,
_______ रावांचे नाव घेते, सर्वांनी द्या आशीर्वादाच्या शुभेच्छा.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.