छोटे छोटे उखाणे | Chote Chote Ukhane
या पोस्टमध्ये आपण Chote Chote Ukhane बघणार आहोत. उखाणे घेताना पाहुण्यांचा आग्रह असतो आणि त्यांचा चेहरा बघण्याचा देखील आनंद मिळतो. उखाणे घेणे खूप मजेशीर आहे आपल्या महाराष्ट्राला याची देणगी लागली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील तुम्ही हे आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा.
1- सूर्य देवामुळे, आपल्या पृथ्वीवर पडतो प्रकाश,
__________ आज माहेर सोडून आली, म्हणून भरून आले आकाश.
2- लागू देणार नाही, तुला कोणाची नजर,
__________ तुझ्यासाठी मी, नेहमी असेन हजर.
3- चांदीच्या झाडांना, सोन्याची पाने,
_______ रावांसोबत गाईन, सुखी संसाराची गाणे.
4- इंद्रायणी काठी, देवाची आळंदी,
_______ आणि_______ ची जोडी नेहमी राहूदे, अशीच आनंदी.
5- दोन्ही कुळांचे, नाव वाढले,
_________ राव मला, पहिल्यांदा बघताच लाजले.
6- अंगणात पारिजात, तिथे घ्या विसावा,
_______ रावांच्या डोळ्यात, माझाच चेहरा दिसावा.
7- संसाराच्या सारीपटाचा, कसा उधळला डाव,
माझ्या नावाच्या पुढे अखेर, _______ रावांचे लागले नाव.
8- पानांच्या जाळीत लपोनि, चंद्र पाहतो गडे,
__________ च्या भेटीसाठी, जीव सारखा उडे.
9- नाव घ्या, नाव घ्या, पाठी लागल्या साऱ्याजणी,
__________ राव आहेत माझ्या, सर्वस्वाचे धनी.
10- आल्या बरसाती, घेऊन मेघ मल्हाराची धून,
____________ रावांचे नाव घेते, मी पवारांची सून.
11- रिमझिम पावसासोबत, पडल्या गारा,
_________ रावांमध्ये माझा, अडकलाय जीव सारा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.