101 Aagri Koli Ukhane | आगरी कोळी उखाणे.
Aagri koli ukhane हे खास आपल्या आगरी कोळी बंधू-भगिनींसाठी बनवले आहेत. लग्नकार्यात उखाणे खूप महत्वाचे असतात. उखाणे म्हंटले कि आपले नातेवाईक खूप उत्सुक असतात पण काही नवरा नवरी ज्यांनी उखाणे पाठ नसतात केले मात्र त्यांची हवा टाईट होते.
या वेबसाईटमध्ये तुम्हाला Aagri koli ukhane आणि सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. इंटरनेटवर असे उखाणे फार कमी मिळतील तुम्हाला. अश्याच मजेशीर उखाण्यासाठी नेहमी या वेबसाईटला भेट द्या.
1-मायेची माउली, सांजेची साउली,
__________ रावांचे नाव घेते, जय एकविरा माउली.
2- पापलेट माश्याला भेटला आहे, राज्य माश्याचा दर्जा,
__________ रावांना येत नाही, मासे खाल्याशिवाय ऊर्जा.
3- गळ्यात सोन्याच्या माला, घालून मी मिरवेन,
________ ला आजपासून मी, Fortuner मधून फिरवेन.
4- बुधवार, शुक्रवार लागतात, पापलेट आणि म्हावरे,
_______ राव आहेत, माश्यासाठी खूप हावरे.
5- गळ्यान घालायला आवडते, मला सोन्याची साखळी,
_________ आहे नाजूक जशी, गुलाबाची पाकळी.
6- कार्ला डोंगरावर आहे, एकविरा आईचे स्थान,
______ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
7-पहिल्या भेटीतच गेलीस, जीवाला लावूनशी घोर,
_________ तू दिसतस, जणू चंद्राची कोर.
8- आई-बाबांशिवाय, मी राहीन कसा,
_____ तुझे नादान झालोय, मी येरा पिसा.
9- एकविरा आईचे मंदिर आहे, पावित्र्याचे स्थान,
________ रावांमुळे मिळाला, सौभाग्याचा मान.
10- मुंबईच्या समुद्रात, म्हात्रेंची होडी,
एकविरा आईच्या कृपेने सुखी राहो, _____ आणि _____ ची जोडी.
12- मांडवाने सजविला, म्हात्रेंचा दार,
________ रावांचे प्रेम राहूदे, माझ्यावर अपरंपार.
13- मुखात नेहमी असावे, एकविरा आईचे नाव,
________ रावांचे नाव घेते, अखेर आली त्यांच्या गाव.
14- एकविरा आई आहे, आमची दैवत,
_______ रावांचे नाव घेते, आई तुझ्या समोर माथा ठेवत.
15- करंजे जेटीवर, आहे खूप म्हावरा,
________ रावांना आहे लग्नाची खूप घाई, त्यांना सावरा.
16- समुद्राच्या किनारी, सुकवायला ठेवले बोंबील,
_______ राव तोंड करा हिकडे, नायतर घशात कोंबील.
17- संसार म्हणजे, कधी ऊन कधी पाऊस,
________ झाली माझी बायको आता, जळणाऱ्यानो नजरा नका लावूस.
18- हिऱ्याचा कंठा, मोत्याचा घाट,
_________ च्या हौशीसाठी, केला सगळा थाट.
19- चांदीच्या ताटात, मटणाचं तुकर,
_______ राव भरवते घास, तोंड करा हिकर.
20- जाळ्यात कोणाच्या, मी फसायची नाय,
_____________ नाखवाची, मी लवर हाय.
21-चिकणी मासोळी, दिसायला छान,
_______ रावांचे नाव घेते, मला फार आहे त्यांचा अभिमान.
22- डोंगराची माऊली, कोल्यांची सावली,
________ राणी माझ्या मनास, खूप भावली.
23- साऱ्या शहरात, डंका असो नावाचा,
_______ रावांनी नाव वाढवले, ______ गावाचा.
24- सुखदुःखाची, ऊन सावली,
__________ रावांचे नाव घेते, जय एकविरा माऊली.
25- समुद्र किनारा आहे, आगरी कोळ्यांची शान,
_____ रावांना आहे, वरळी कोळीवाड्यात खूप मान.
क्लिक करा—>स्मार्ट उखाणे महिलांसाठी <—क्लिक करा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.