वट सावित्रेला नमन करते, तुझ्या सृष्टी मुळे आनंदी आहे मनुष्य, _______________ रावांचे नाव घेते, त्यांना मिळूदे १०० वर्ष आयुष्य.

वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात, _________ रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असुदे आमच्यावर आशीर्वादाचे हात.

वटपौर्णिमेला व्रत ठेवायची, आहे प्रथा, ________ रावांसोबत ऐकेन आज, वटसावित्रीची कथा.

तुटता तारा पाहून, माझी पूर्ण झाली आहे इच्छा, ____________ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

वटवृक्षाची पूजा करून, गरजू व्यक्तीला करावे दान, ______________ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

सावित्रीने केली सत्यवान नावाच्या, राजकुमाराची निवड, ________________ रावांची होती मला, कॉलेजपासून आवड.

सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले, _______ सुखी राहूद्या जन्मोजन्मी, असेच नाते अपुले.

झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास, _______ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास.