50 अविवाहित मुली आणि मुलांसाठी उखाणे | Avivahit Ukhane in Marathi.
Avivahit ukhane in marathi हे लग्न ज्यांचे होणे बाकी आहे त्या लोकांसाठी आहेत.जेव्हा कोणाचे लग्न ठरते तेव्हा उखाण्यांचा शोध खूप केला जातो किंवा घरच्या व्यक्तींना विचारून उखाणे बनवतात. उखाणे शिवाय लग्न हे अधुरे आहे. उखाणे घेताना फार मज्जा येते.
नवीन नवरी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा गृहप्रवेश करताना उखाणे म्हंटले जातात. हे उखाणे अविवाहित व्यक्तींसाठी आहेत ज्यांचे अजून लग्न जमले किंवा होणे बाकी आहे. Avivahit ukhane in marathi हे मुलं आणि मुलीं दोन्हीकरीता आहेत. अविवाहित मुल आणि मुली ज्यांचे लग्न ठरते तेव्हा ते या उखाण्यांच्या शोधात असतात.
अविवाहित मुलींसाठी उखाणे | Ukhane for Unmarried Girl in Marathi.
1- मी सांगतो तुला, माझ्या मनातली भावना,
_________ तुला बघताच माझे मित्र म्हणतात, हि तुझी डाव ना.
2- असा बेभान हा वारा, कुठे हि नाव मी नेऊ,
_______ लग्नाआधीच मी, तुझ्या घरी कशी येऊ.
3- माझी डोली चालली ग, दूर देशी नव्या गावा,
तिथे सोबतीला येईल, _________ माझ्या स्वप्नांचा छावा.
4- नवीन वर्ष आले, आतातरी करूया लग्न,
_________ राव मला, आपल्या संसारात व्हायचं आहे मग्न.
5- पावसामुळे झाले आहेत, पशु पक्षी तृप्त,
_______ रावांसोबतचे नाते, नाही राहणार आता गुप्त.
6- मझ पाहताच सखे, हसतेस तू जराशी,
___________ लग्न करून कधी येशील, माझ्या घराशी.
7- तुझ्या आई बाबांना, सांगेन सर्व मी बोलवून,
जर नाही म्हटले तर ____ ला न्हेईन मी पळवून.
8- कोणतीही व्यथा सांगितली कि, नाही दिला कधी नकार,
______ रावांना दिला मी, माझ्या मनाने होकार.
9- फोनवर नेहमी असतात बिझी,
_____ राव लग्नानंतर, तुमची लाईफ नाही इझी.
10- माझ्या आई वडिलांचा, एकुलता एक आहे मी पुत्र,
_____तुझ्यासाठी बनवले मी, माझ्या नावाचे मंगळसूत्र.
11- देवापुढे लावते, रोज सकाळी दिवा,
_____रावांचा सहवास, मला नेहमी हवा.
12- छोटस हृदय, तू माझं चोरलय ,
______ त्यावर नीट बघ, तुझंच नाव कोरलंय.
13- आयुष्यात एकत्र राहण्याचा, निर्णय तुझा आहे,
_____तुला शेवटपर्यंत साथ देईन, हा शब्द माझा आहे.
14- तुझे-माझे नाते, नेहमी असेच रहावे,
_____आपल्या लग्नानंतर, कधी मैत्री तर कधी प्रेम असावे.
15- किती प्रेम करतो एकमेकांवर, हे कोणाला सांगितले तर कळणार नाही,
_______ रावांसारखे जीवनसाथी, शोधूनही मिळणार नाही.
16- माझ्या आयुष्याची पतंग, खुप उंच उडेल,
जेव्हा साथ देणारी बायको ____ असेल.
17- फोनवर तासभर बोलण्याची, सवय काही सुटेना,
______तुझ्यावाचून, एक मिनटंहि करमेना.
18- बस झाली आता, लपून छपून भेट,
_______ मला बायको बनवून न्ह्या, तुमच्या घरी थेट.
19- तुझ्या प्रेमाचा सुगंध, अजूनही बहरत आहे,
____ शेवटच्या क्षणापर्यंत, मी फक्त तुझाच आहे.
20- तुझ्या प्रेमाची, लागली आहे चाहूल,
वाट बघते _____ रावांच्या घरात, कधी टाकते पाऊल.
21- खूप नाती जुळतील, आता आपल्या जीवनात,
जेव्हा माणसे जमतील, ____आणि _____ च्या लग्नात.
22- मी तुझा जाणू, तू माझी शोना,
_____ घरी सांगना आपलं, आणि लवकर माझी बायको होणा.
23- डोकं दुखत होत, म्ह्णून डोक्याला लावलं विक्स,
कोणाकोणाचे नाव घेऊ, अजून लग्नच झालं नाही फिक्स.
24- बस झाले आता, फोनवर दिवस रात्र बोलणे,
______ राव घरी सांगा लवकर, पाहुणे मारतात खूप टोमणे.
25-कॉलेज मध्ये असताना आवडली, आणि मारला प्रपोझ,
______ च्या घरी लग्नासाठी मागणे टाकायला गेलो, तेव्हा नाही केला कोणी अपोज.
26- अन्न, वस्त्र आणि निवारा आहे मनुष्याची गरज,
_____ ने माझी परिस्तिथी न बघता, होकार दिला सहज.
27- तुझ्यासोबत राहायची, लागली आहे सवय,
_______ तुझं आडनाव, माझ्या नावापुढे हवय.
28- इंद्रधनुष्यात असतात, सप्त रंग,
_______ रावांच्या येण्याने, झाले मी दंग.
29- पेन चालायला, त्यात लागते शाई,
______ ला लगीन करण्याची, आहे खूप घाई.
30- आपल्या लग्नात पाहिजे, मला मोठी पंगत,
________ रावांची लागली आहे, मला संगत.
31- पावसाळ्यात, पाण्याला नाही अंत,
_____ रावांना केले मी, पहिल्या भेटीतच पसंत.
32- कळत नाही माझेच मला, स्वप्न आहे कि भास,
________ रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास.
33- नको यार, नको बसू रुसून,
_______ तूच माझ्या आई बाबांची, होणारी सून.
34- कोरा कागज, काळी शाई,
______ ला लग्न करण्याची, खूपच घाई.
35- पावसाचा सिजन, झाला आहे चालू,
________ मग कधी आणताय, मला नेसायला शालू.
36- Western पेक्षा, Indian ड्रेसमध्ये दिसतेस भारी,
________ माझ्याशी लग्न कर, तुझी ईच्छा पुरवेल सारी.
37- मध्ये नथीचा नवरा म्हणून, काहीतरी आला होता ट्रेंड,
_______ रावांनी माझा फोटो बघताच, प्रेमाचे मेसेज केले सेंड.
38- तारीख ठरली आणि हॉल केला बुकिंग,
_______ आपल्या लग्नाची, झाली सर्व शॉपिंग.
39- जरीची साडी नेसलीस कि, दिसतेस खूप सुंदर,
______ला बायको बनवण्यासाठी, लावला मी पहिला नंबर.
40- दादर चौपाटीवर बसून, समुद्राची बघायला आवडते लाट,
___________ आपल्या लग्नाची, मी खूप बघते वाट.
41- दिवस रात्र, तुझ्याच विचरामंध्ये असतो मी मग्न,
______ सोबतच करायचे, आहे मला लग्न.
42- माझ्या हृदयाला कान लावून, आवाज ऐकतो तो,
________ रावांना आज लग्नासाठी, सर्वांसमोर बोलते हो.
43- आई बाबा मानत नव्हते, कसेतरी मनवलें,
_________रावांसोबत, अखेर लग्न जुळवले.
44- तुझ्यासाठी माझा, रोज जीव झुरे,
_________ तुझ्यासोबत लग्नाचे, स्वप्न होउदे पुरे.
45- चंदेरी राती हातात हात, दे माझ्या,
________ चे नाव घेतो मी, तुझ्या दिलाचा राजा.
46- काश्मीर ते कन्याकुमारी, फिरवेन तुला,
_______ तुझा पती होण्याचा, अधिकार दे मला.
47- वादा केलास विसरू नकोस, याद ठेव पक्की,
_________ सोबत माझे लग्न, पुढच्या वर्षी आहे नक्की.
48- लग्नाची शॉपिंग केली आहे, सतराशे साठ,
____ रावांच्या घरी जाण्याची, बघते मी वाट.
आणखी उखाणे वाचा-> Shivaji Maharaj Ukhane | शिवाजी महाराज उखाणे. <—-क्लीक करा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.