Bride Ukhane Marathi
Bride Ukhane Marathi हे खास नवीन नवरीसाठी लिहिले गेले आहेत. असे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर कुठेच मिळणार नाहीत. या वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उखाणे पोहोचले आहेत. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.
Bride Ukhane Marathi हे अतिशय सोप्या भाषेत लिहिले गेले आहेत ज्याने करून एखाद्या नवीन नवरीला उखाणे घेताना अडथळे येणार नाहीत. उखाणे घेण्याची परंपरा महाराष्ट्रात फार जुनी आहे ही परंपरा पण अशीच कायम ठेवूया आणि उखाणे आवडल्यास आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा.
1- जुळल्या तारा, पहिल्या भेटी,
_________ रावांचे नाव मुखात, नेहमी येती.
2- माझी फुले सुरांची, मधुबोल गंध देती,
________ रावांचे गाणे ऐकून, सारे धुंद होती.
3- एकविरा माउली, नवसाला पावली,
_________ रावांमुळे भेटली मला, सुखाची सावली.
4- हळदीत नाचूनाचूनी, होते मी दंग,
________ रावांच्या नावाने, मेहंदीचा उठून आलाय रंग.
5- छोट्या या संसारी, तू राजा मी राणी,
__________ आजपासून भरूया, चाळीतल्या नळावर पाणी.
6- कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाच आलया,
____________ रावांना मंडपात बघून, मन भरून गेलया.7- सूर भेटला सुराला, गाण आल तालावर,
_________ रावांच गाण ऐकून, हसू आल गालावर.8- हसले तुझ्या नयनात, कसे धुंद चांदणे,
माझे स्वप्न होते, यावर्षी ____________ सोबत, लग्न गाठ बांधणे.9- शुक्र चांदणे मावळले, विरती रम्य तारा,
_________ रावांमुळे भेटलाय, जीवनाचा आनंद सारा.10- सज्ज मंडपी, सनई चौघडे वाजे,
_________ रावांना येताना पाहताच, मि लाजे.
Bride Ukhane Marathi For Husband
11- निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी,
______________ रावांसोबतच्या प्रेमाची, आज सर्वांना सांगेन कहाणी.12- मी बोलू कुना, प्रभू सांगू कुणा,
_____________ मला करमत नाही, तुमच्याविना.13- दोघांमधील आहे, प्रीती युगायुगांची,
लव मॅरेज केलं तर, ________ कसली भीती आहे लोकांची.14- गळाभर मोती माझे, अंग बाजूबंद,
___________ रावांचा लागलाय मला, कायमचा छंद.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.