Ghas Bharavtanache Ukhane | घास भरवताना उखाणे.
लग्न झाले कि शेवटी पती पत्नी जेवायला बसतात तेव्हा Ghas Bharavtanache Ukhane उखाणे घेतले जातात. हे उखाणे खूप आधीपासून चालत आलेली परंपरा आहे. उखाणे म्हंटले कि एक गम्मत. नवरा नवरीच्या तोंडातून उखाणे ऐकताना खूप मज्जा येते.
Ghas Bharavtanache Ukhane हे घ्यावेच लागतात कारण पाहुणे मंडळी खूप आग्रह करतात. या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे भेटतील. हे उखाणे तुम्ही सहज कॉपी आणि शेयर करू शकता.
1- आजचा दिवस आहे, आमच्यासाठी खास,
_______ रावांना भरवते मी, गुलाबजामूनचा घास.
2- सोन्याचे ताट, चांदीची वाटी,
सात जन्म घेईन मी, _______ रावांसाठी.
3- सर्व पाहुणे मंडळी जमल्याने, दिवस आहे आजचा खास,
_______ ला भरवतो, मी जिलेबीचा घास.
4- लोक गणपती बाप्पा, बसवतात शाडूचा,
______ ला घास भरवतो मी, लाडूचा.
5- कधी आमचे लग्न होईल, याचा लागला होता ध्यास,
________ रावांना भरवते, मी बुंदीचा घास.
6- विठ्लाच्या मंदिरात, वारकऱ्यांचा सहवास,
________रावांना भरवते मी, पुरी भाजी चा घास.
7- सासू सासरे कितीही कडक असले तरी, मी त्यांच्यासाठी आहे खास,
______ रावांना भरवते, मी लाडूचा घास.
8- शेतकऱ्याला असते, पावसाची आस,
______ रावांना देते,_______ चा घास,
9- प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे, स्त्रीचा हात असतो,
________ च नाव घेऊन, जेवणाला बसतो.
10- चायनीजमध्ये आहे माझे फेव्हरेट, ट्रिपल राईस,
_______ रावांसोबत खाईल मी, आईसक्रीमची एक स्लाईस.
11- अंगणात पसरला, मोगऱ्याच्या फुलांचा वास,
_______ ला भरवतो मी, लाडूचा घास.12- मतभेदांच्या पाडून भिंती, प्रेमाचे घर उभे करूया,
____________ रावांचे नाव घेते, एकमेकांना घास भरवूया.13- तुझी दौलत नको, सुखी मला ठेवशील का,
_____________ आजपासून माझ्या हाताने, जेवशील का.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.