Gauri Ganpati Ukhane in Marathi
Gauri Ganpati Ukhane हे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. गौरी गणपती हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण मानला जातो. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात साजरा केला जातो.
हा सण सर्व धर्माचे लोक एकत्र येण्यासाठी साजरा केला जातो. हे उखाणे तुम्हाला जर आवडले तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. अशाच नवीन उखाण्यांसाठी या वेबसाईटला नेहमी भेट द्या.
1- गणपती बाप्पा, सर्वांच्या पूर्ण कर ईच्छा,
_________ रावांचे नाव घेते, सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
2- सिद्धिविनायका तुझे, सिद्धटेक गाव,
_______ रावांचे नाव घेते, बाप्पा आम्हाला पाव.
3- हलगीच्या तालावर, ढोल वाजतो,
____________ रावांचे नाव घेते पाटिल घराण्याचा बाप्पा, गावात खुप गाजतो.
4- गौराई माते, नमन करते तुला,
________ रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.
5- सोनपावलांनी आली, आमच्या घरी गौरी माता,
_________ रावांचे नाव घेते, गौराईसाठी आरती गाता.
6- गौरी गणपतीसाठी कोकणात जाताना, लागतात फार रांगा,
बाप्पा ____________ रावांना सुट्टी देत नाही त्यांचा बॉस, जरा त्यांना सांगा.
7- पंचपक्वान, झिम्मा फुगडी, पूजा आरतीची घाई,
_________ रावांचे नाव घेते, सुखी ठेव आम्हा गौराई.
8- घालुनी फुगड्या साऱ्यांनो, हिला मनोरंजित करा,
_________ रावांचे नाव घेते, दर वर्षी गौराई ये आमच्या घरा.
9- लालबागचा राजा आहे, मुंबईचा शान,
_________ रावांचे नाव घेताना, मला फार वाटतो अभिमान.
10- गणपती राया, पडते मी पाया,
_________ रावांवर असुदे, तुम्हा सर्वांची माया.
11- कोणतीही येऊदे समस्या, तो सोडणार नाही आमची साथ,
________ रावांचे नाव घेऊन आमच्या लाडक्या गणरायाला, नमन करते जोडुनी हात.
12- गौरी गणपतीच्या आगमनाने, सजली आज धरती,
____________ रावांचे नाव घेऊन, करते आज आरती.
13- आली ग गौराई, माय माझी माहेराला,
__________ रावांचे नाव घेते, चला सर्वांनी पूजनाला.
14- सोनमोत्यांच्या पावली, आली अंगणी गौराई,
___________ रावांना जन्म देणारी, धन्य ती आई.15- कोकणात असतो, गणेशोत्सव फार मोठा,
_______ रावांचे नाव घेते, बाप्पा त्यांना कधी नको होऊ दे तोटा.16- कोकणसारखा गणेशोत्सव, कुठेच होत नाही साजरा,
____________ रावांचे नाव घेते, त्यांचा चेहरा फार आहे लाजरा.17- बुद्धीचा देव म्हणजे, गणपतीराया,
__________ रावांच्या कुशीत, भेटली मला छाया.18- ओझरचा विघ्नेश्वर, लांबरुंद आहे मूर्ती,
___________ रावांचे नाव घेते, काय सांगू या बाप्पाची श्रीमंती.19- विघ्नविनाशक गणेशदेवा, भावभक्तीचा हृदयी ठेवा,
_______________ रावांचे नाव घेते, बाप्पा तुझी मी आयुष्यभर करेन सेवा.20- तुझ्या कृपेची छाया, आमच्यावर असू दे,
____________ रावांचे नाव घेते, बाप्पा तुझे स्थान साऱ्या जगात वसू दे.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.