कुंकवाचा साज, असाच कायम राहू द्या,
______ रावांना डोळे भरून, ७ जन्म पाहू द्या
प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौणिमेची, ________ रावांचे नाव घेते, सून देशमुखांची
पतीच्या दीर्घयुष्यासाठी, निष्ठेचे बंधन, ______ रावांचे नाव घेऊन करते, सर्वांना वंदन
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा, __________ रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा
आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
________ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा
झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास,
_______ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास
आणखी वाचा
मराठी सण म्हणजे, आनंदाचा क्षण,
_______ रावांचे नाव घेते, सुखी राहुदेत सर्वजण
पावसाच्या येण्याने, पक्षांचे चालले आहे कूजन,
________ रावांचे नाव घेते, आणि वडाचे करते पूजन
देवच बनवतो, ७ जन्माची गाठ,
_______ रावांच्या दीर्घआयुष्यासाठी, वडाला फेरे मारते सात
आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊदेत तुमच्या ईच्छा,
______ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा