मकर संक्रांति म्हणून, सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत,
_____ रावांना मी सदा, खुश ठेवीन माझ्या कुशीत.
मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा,
_____ रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा.
मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून, धुवू सारे दुःख, _____ रावांच्या जीवनात, नेहमी असुदे सुख.
मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा,
_____ रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा.
तिळाचे लाडू खाऊन, नवीन वर्षाची सुरवात करू गोड, _______ रावांना अशीच असुदे, लहान आणि थोर माणसांची ओढ.
आणखी वाचा
मकर संक्रांतीला, काळ्या कापडाला फार आहे डिमांड,
_____ राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा, नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड.
हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून,
सर्वजण विचारतात _____ हॅंडसम, भेटले कुठून.
पतंग उडवण्याची प्रथा सुरु केली, भगवान राम आणि हनुमानाने,
______ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहाप्रमाणे.
नवीन वर्ष आणि, आमचा पहिला सण संक्रातीचा
____ आणि___ चा जोड़ा राहो सात जन्माचा.
आणखी वाचा
क्लिक करा
Arrow