101 Haldi Kunku Ukhane Marathi | हळदी कुंकू उखाणे.
Haldi Kunku Ukhane हे प्रत्येक पूजे मध्ये अथवा महिलांच्या कार्यक्रमामध्ये साजरा केला जाणारा कार्यक्रम आहे. हळदी कुंकू हा भारतीय स्त्रिया एकत्र येऊन साजरा केला जाणार मोठा कायर्क्रम असतो. नवीन वर्षाची चांगली सुरवात हि हळद कुंकू लावून केली जाते.
Haldi Kunku Ukhane हा कार्यक्रम सर्व लोकांच्या घरी अथवा सोसायटी मध्ये केला जातो. सत्यनारायणाच्या पूजेला देखील हळदी कुंकू चा कार्यक्रम ठेवला जातो. यावेळी महिलांना फुल आणि छोटीशी भेटवस्तू दिली जाते. या कार्यक्रमात सर्व स्त्रिया उखाणे घेतात आपल्या पतीसाठी.
1- नीलमणी आकाशात, चंद्राची प्रभा,
_______ रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा.
2- हळदी कुंकवाला, गिफ्ट देण्याची आहे प्रथा,
_________ रावांसोबत राहून, दूर झाल्या साऱ्या व्यथा.
3- हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला, जमल्या साऱ्या महिला,
__________ रावांचे नाव घेण्याचा, मला मान भेटला पहिला.
4- जिथे घराची स्वच्छता, तिथे घराची शोभा,
_________ रावांच्या पाठी, परमेश्वर उभा.
5- वडिलांची माया आणि आईची कुशी,
_____रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
6- गळ्यात मंगळसूत्र, हि पतिव्रतेची खून,
_____ रावांचे नाव घेते _____ ची सून.
7- गणपती बाप्पा, वंदन करते तुला,
_____रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.
Ukhane in Hindi for Haldi Kunku<– क्लिक करा
8- सारंच गेलंय बदलून, माझं नावही नव,
_________ रावांनी दिल मला, सर्वच जे हवं.
9- सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास,
________रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.
10- जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,
_______ रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.
11- भारत देश स्वतंत्र झाला, १५ ऑगस्टच्या दिवशी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.
12- हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण.
13- दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,
______ रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
14- दिवाळी होती म्हणून, बनवले करंजीचे सारण,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंचे कारण.
15- सर्व दागिन्यात, श्रेष्ठ काळे मणी,
_______ राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी.
16- हळदी कुंकूला आल्या, साऱ्या महिला नटून,
______ रावांनी आणलेली साडी दिसते, सर्वात उठून.
17- हळदी कुंकूला भेटतात, महिलांना गिफ्ट,
_______ रावांनी दिली होती मला, लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट.
18- फुलांनी सजवले, हळदी कुंकवाचे ताट,
_____ रावांमुळे मिळाली, माझ्या आयुष्याला वाट.
19- हळदी कुंकूला झाली, महिलांची गर्दी,
________ राव घालतात, पोलिसांची वर्दी.
20- गोकुळ झाल दंग, पाहून श्रीकृष्णाचे खेळ,
______ रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाची वेळ.
21- आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.
22- श्रीकृष्ण रास खेळे, गोपिकेच्या मेळी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.
23- हळदीचा रंग आहे पिवळा, आणि कुंकूचा लाल,
_________ रावांच्या जिवनात, आहे मी खुशहाल.
24- हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ,
_______ रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ.
25- जळगाव फेमस आहे, पिकवण्यासाठी केळी,
_______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.
26- कपाळावर कुंकू, आणि गळ्यात मोत्याचा हार,
_________ रावांचे नाव घेताना, आनंद होतो फार.
27- कान भरण्यात, बायका आहेत हौशी,
_____ रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
28- साड्या घातल्या आहेत, सर्वानी छान,
_____ रावंच नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
29- हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
_____ रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.
30- हळदी कुंकूसाठी, जमल्या साऱ्या बायका,
_______रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका.
31- कपाळावर कुंकू, त्याखाली हळद सजते,
________ रावांच्या म्हणण्याप्रमाने, आजच्या दिवशी नटते.
32- तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते, आशिर्वाद द्यावा,
____________ रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
33- हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,
_______रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.
34- प्राणहीन भासे रासाचा रंग,
________ रावांचं नाव घेते आणि सुरू करते, हळदी कुंकवाचा आरंभ.
35- मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी,
_______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.
36- नभी उमटले, सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,
________ रावांचे नाव घेते, मिळो त्यांना दीर्घायुष्य.
आणखी वाचा—>नवरीसाठी खास उखाणे<—क्लीक करा
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.